आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकेतही नाेट बदली बंद; 500ची नाेट मात्र चालेल 15 डिसेंबरपर्यंत, 1000ची नोट पूर्णत: बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बँकेतून शुक्रवारपासून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत. जुन्या नोटा आता फक्त खात्यातच जमा करता येतील. शिवाय गुरुवारी मध्यरात्रीपासून १००० रुपयाची नोट पूर्णत: बंद झाली आहे. बँकेशिवाय ही नोट कुणीही स्वीकारणार नाही. ५०० रुपयाची जुनी नोट आता १५ डिसेंबरपर्यंत निवडक ठिकाणी वापरण्याची सूट मात्र मिळाली आहे. पेट्रोलपंप, सरकारी रुग्णालये आणि रेल्वे तिकीट यासारख्या आवश्यक सेवांचा त्यात समावेश आहे.

मोठ्या जुन्या नोटा चालवण्याची मुदत गुरुवारी संपत होती. त्या पार्श्वभूमीवर आढावा घेतल्यानंतर सरकारने फक्त ५०० रुपयाची नोट निवडक ठिकाणी चालवण्याची सूट दिली आहे. बँकांत नोटा बदलून घेणारांची संख्या खूपच कमी राहिली आहे. त्यामुळे बँकिंगपासून दूर असलेल्या लोकांनी खाते उघडावेत म्हणून आता जुन्या नोटा फक्त खात्यातच जमा करण्याचा निर्णय घेतला, असा सरकारचा दावा आहे. दरम्यान, अर्थमंत्री जेटलींनी बँकांच्या बैठकीत डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास सांगितले.
पण या तीन प्रश्नांचे काय ?
- ज्यांचे अद्याप खाते नाही आणि जुन्या नोटा आतापर्यंत बदलल्या नाहीत,त्यांनी काय करावे?
आता खूप कमी लोक नोटा बदलण्यासाठी बँकांत येत असल्याचा सरकारचा दावा आहे. जुन्या नोटा खात्यातच जमा व्हाव्यात यासाठी लोकांचे खाते उघडण्यावर भर राहील.
- चेकद्वारे आठवड्यात २४ हजार रु. काढण्याची मर्यादा होती. हा आदेश २४ नोेव्हेंबरपर्यंत होता. याबाबत काय निर्णय झाला?
रिझर्व्हबँकेने एक दिवसापूर्वीच सांगितले होते की, गुरुवारी यावर निर्णय होईल. मात्र, अर्थ मंत्रालयाने त्यावर काहीही सांगितले नाही.
- सरकारने ५०० रुपयापर्यंत मोबाइल रिचार्जसाठी ५०० रु.च्या जुन्या नोटा ग्राह्य धरल्या. मात्र, दुकानदार जुन्या नोटा घेऊन करेल काय? हे निर्देशात स्पष्ट केले नाही.

नरमाईचे संकेत; काळ्या पैशावर ६०% कराची तयारी
काळ्या पैशावर नरमाई संकेत आहेत. सरकार घोषित संपत्तीवर ६०% कर लादून वैध करण्याची सूट देऊ शकते. गुरुवारी रात्री मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊ शकते. अघोषित संपत्तीवर ३०% करासोबतच २००% दंडाची घोषणा केली होती. प्राप्तिकर कायद्यात दुरुस्तीसाठी या अधिवेशनातच विधेयक येऊ शकते. कारवाईच्या भीतीपोटी नोटा जाळण्याऐवजी लोक त्या बँकेत जमा करतील, असे सरकारला वाटते. दोन आठवड्यात जनधन खात्यांत २१ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.

पुढे वाचा, पेट्रोल पंपासह निवडक ठिकाणीच चालेल ५०० रुपयाची जुनी नोट...
बातम्या आणखी आहेत...