आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बझारामधून विथड्रॉवल करता येणार रुपये; काय डील आहे मोदीजी? केजरींंचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका जवळपास सगळ्यांनाच बसत आहे. नोटांच्या कमतरतेमुळे मार्केटही कोट्यावधींचे व्यवहार थंडावले आहेत. बँंका तसेच एटीएमबाहेर लोक तासांतास रांगांमध्ये उभे राहात आहेत. यावर उपार म्हणून आता बिग बझारात डेबिट कार्ड स्वॅप करून 2000 रुपये काढता येणार (विथड्रॉवल) आहे.

बिग बझाराचे देशभरात 260 स्टोअर्स आहेत. लोक आपले डेेबिट कार्ड स्वॅप करून 2000 रुपये विथड्रॉवल करू शकतात. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बिग बझारसोबत टायअप केले असल्याची माहीती बिग बझाराचे सीईओ किशोर बियाणी यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे.

दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मोदी सरकारवर टिकास्त्र दागले आहे. 'आधी रिलायन्स, नंतर पेटीएम आणि आता बिग बाझार. मोदीजी काय डील झाली आहे?, असा खोचक सवाल केजरीवाल यांनी 'ट्वीट' करून पंतप्रधान मोदींना केला आहे.'

काय म्हणाले एक्सपर्ट्‍स...?
- बिग बाझाराचे हे स्ट्रॅटजिक पाऊल असल्याचे एक्सपर्ट्सनी म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मार्केट थंडावले आहे. बिग बाजारात येणार्‍या ग्राहकांची संख्या देखील मंदावली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
- दरम्यान, यापूर्वी अर्थमंत्रालयाने देशभरातील पेट्रोल पंपांवर डेबिट कार्ड स्वॅप करून रुपये विथड्रॉवल करू शकतात, अशी घोषणा केली होती.
- नोटाबंदीनंतर एटीएम आणि बँकांबाहेर होणार्‍या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले होते.

पुढील स्लाइडवर वाचा...सध्या कुठून विथड्रॉवर करू शकता कॅश?
बातम्या आणखी आहेत...