आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने ‘अाेव्हरफ्लाे’ खात्यांची माहिती मागवली, PM म्हणाले- नोटबंदी भ्रष्टाचाराची मुळे नष्ट करेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर ३० डिसेंबरपर्यंत ज्या खात्यांमध्ये अचानक मोठी रक्कम जमा करण्यात आली, अशा खात्यांची माहिती केंद्र सरकारने बँका तसेच टपाल खात्याला मागितली आहे. १५ जानेवारीपर्यंत ही माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, जी खाती पॅन क्रमांक किंवा फॉर्म-६०ने जोडली गेलेली नाहीत, अशा खातेदारांनी २८ फेब्रुवारीपर्यंत आपले पॅन क्रमांक बँकांत द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत. ८ नोव्हेंबर रोजी रात्री नोटबंदी लागू झाल्यानंतर एखाद्या खात्यात अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम आली तर त्याची चौकशी होईल, असेही जाहीर करण्यात आले होते.
 
या खात्यांवर लक्ष : बँका व टपाल खात्याला ज्या बचत खात्यांमध्ये ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात एका दिवसात ५० हजारांहून अिधक रुपये जमा करण्यात आले असतील किंवा या संपूर्ण काळात अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असेल त्याची माहिती १५ जानेवारीपर्यंत अर्थ मंत्रालयास कळवण्यास सांगण्यात आले आहे. 

चार प्रकारची माहिती मागवली
. खात्यात जमा करण्यात आलेली एकूण रक्कम.
२. खात्यातून काढण्यात आलेली एकूण रक्कम.
३. १ एप्रिल २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ या काळात जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती.
४. ९ नोव्हेंबर-३० डिसेंबरदरम्यान खात्यातील जमा.

चालू खात्यांवरही नजर
ज्या चालू (करंट) खात्यांवर ९ नोव्हेंबर तर ३० डिसेंबर या काळात १२.५० लाखाहून अधिक रक्कम जमा करण्यात आली असेल त्यांची माहितीही कळवण्यात यावी, असे निर्देशही अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. यात सहकारी बँकांत जमा करण्यात आलेल्या रकमांचाही समावेश अाहे.

नोटबंदीचा निर्णय भ्रष्टाचाराची मुळे नष्ट करेल : पंतप्रधान
नवी दिल्ली- नोटबंदीचा निर्णय भ्रष्टाचाराची मुळे नष्ट करणारा ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केला. भाजप कार्यकारिणी बैठकीत समारोपाच्या भाषणात मोदींनी नोटबंदीबद्दल भाष्य करताना भारतीय जनतेच्या संयमाची स्तुती केली. काही दिवस अडचणींचा सामना करून जनतेने नोटबंदीला पाठबळ दिल्याचे मोदी म्हणाले. ही माहिती रविशंकर प्रसाद यांनी नंतर पत्रकार परिषदेत दिली. 

जेटलींचा अार्थिक प्रस्ताव : 
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीत आर्थिक प्रस्ताव मांडला. यातही नोटबंदी हेच मुख्य केंद्र होते. या नोटबंदीमुळे झालेल्या फायद्याची माहिती यात होती. या प्रस्तावानुसार, नकली नोटांचा सुळसुळाट संपवणे आणि दहशतवाद निपटून काढणे हे दोन उद्देश नोटबंदीमुळे यशस्वी ठरल्याचे जेटली यांनी नमूद केले. नोटबंदीने दहशतवाद्यांच्या मुसक्याच आवळल्या गेल्याचे ते म्हणाले. मोदींनी नोटबंदीवर आपल्या भाषणात भर दिला. सोबत नागरिकांचेही आभार मानल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

राेख व्यवहारातच भ्रष्टाचाराची मुळे
रविशंकर प्रसाद यांनी नोटबंदीवर बोलताना रोख रकमेचा विस्तार हेच भ्रष्टाचाराचे मूळ असल्याचे सांगितले. बेनामी मालमत्तांची मुळे याच राेख व्यवहारांत दडली असल्याचे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...