आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच सोने तीसहजारी, 325 रुपयांनी वाढून शनिवारी पोहोचले 30,175 रुपये प्रति दहा ग्रॅमवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक पातळीवरून मिळालेल्या संकेतांनंतर तसेच भारतीय बाजारात लग्नसराईमुळे वाढलेल्या सोन्याच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात शनिवारी झालेल्या व्यवहारादरम्यान सोने ३२५ रुपयांच्या वाढीसह ३०,१७५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले.
 
याआधी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी सोने ३०,३२५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले होते.  शनिवारी झालेल्या दरवाढीमुळे सोन्याच्या दराने चार महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे.
 
तर सोन्याबरोबरच औद्योगिक मागणीत झालेली वाढ आणि चांदीची नाणी तयार करणाऱ्या उद्योगांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीच्या दरातही शनिवारी मोठी वाढ नोंदवण्यात अाली आहे.
 
शनिवारी झालेल्या व्यवहारात दिल्लीतील सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये ६०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या  वाढीसह चांदी ४३,८०० रुपये प्रतिकिलोग्रॅमच्या दराने विक्री झाली असल्याची माहिती सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.
 
दिल्लीतील दर असा  
राजधानी दिल्लीचा विचार केल्यास ९९.९ आणि ९९.५ शुद्ध सोने ३२५ रुपयांच्या वाढीसह अनुक्रमे ३०,१७५ रुपये आणि ३०,०२५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. याआधी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी सोने या पातळीवर पोहोचले होते.

वाढीची कारणे  
- डॉलरमध्ये घसरण झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली.  
- यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावामध्ये तेजी नोंदवण्यात आली.  
- न्यूयॉर्क बाजारात सोन्याच्या भावामध्ये ०.६१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.  
- याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोने या पातळीवर पोहोचले होते.  
- लग्नसराईमुळे भारतीय बाजारातही सोन्याची मागणी वाढली.  
 
चांदीची मागणी वाढली 
 सोन्याप्रमाणे भारतीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या व्यवहारात चांदीच्या भावामध्ये ६०० रुपयांची वाढ होऊन चांदी ४३,८०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर पोहोचली आहे,
 
तर आठवड्याभरात चांदी ७६० रुपयांनी वाढून ४३,३५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. चांदीची नाणी १००० रुपयांनी वाढून ७४०० रुपये (प्रति शंभर खरेदी मूल्य) अाणि ७५,००० रुपये (विक्री मूल्य) पर्यंत पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...