आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाची तक्रार: नोटबंदीने डिप्लोमॅट्सच्या डिनरलाही पैसे नाहीत, अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटबंदीवर रशियाच्या दुतावासने केलेली तक्रार लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे पाठवली आहे. (फाइल) - Divya Marathi
नोटबंदीवर रशियाच्या दुतावासने केलेली तक्रार लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे पाठवली आहे. (फाइल)
नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावर आता पाकिस्ताननंतर रशियानेही नाराजी दर्शवली आहे. दिल्लीत त्यांच्या राजदुतांना चांगले डिनर करण्यासाठीही अडचणी येत असल्याचे रशियाने म्हटले आहे. भारतीय राजदुतांबरोबरही बदला घेण्यासाठी कारवाई करण्याची धमकीच थेट रशियाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिण्यात आले आहे. सुत्रांच्या मते, परराष्ट्र मंत्रालयाने लगेचच ही फाईल अर्थमंत्रालयाकडे पाठवली आहे.

भारतीय राजदुतांना समन्स देण्याची शक्यता..
- मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात रशियाचे राजदूत अलेक्झांडर कदाकिन यांनी 2 डिसेंबरला इंडियन फॉरेन मिनिस्ट्रीला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
- त्यांना लिहिले की, कृपया जरा विचार करा, जर आम्ही रशियाच्या अँगलने विचार केला तर, एका आठवड्यांत आम्हाला 50 हजार रूबल (रशियन चलन) काढता येतात. ही रक्कम कोणत्याही रेस्तरॉमध्ये डिनरचे बिल देण्यासाठीही पुरेसे नाही.
- 1 रूबलचे मूल्य 1.06 रुपये एवढे आहे. एका आठवड्यांत त्यांना 53 हजार रुपये काढता येतात.
- रशियाच्या अॅम्बेसीमध्ये सुमारे 200 लोक राहतात. म्हणजेच आठवड्याला एका व्यक्तीच्या खर्चासाठी 250 रुपयेच काढता येतात.
- सुत्रांच्या मते, विरोध दर्शवण्यासाठी रशिया भारतीय राजदुतांना समन्सही देऊ शकते.

व्हिएन्ना कन्व्हेंशनचे व्हॉयलेशन...
- मीडिया रिपोर्टमध्ये एका विदेशी राजदुताने म्हटले की, नोटबंदीमुळे होत असलेल्या अचडणांबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी अनेकदा संपर्क करण्यात आला. पण तरीही अडचणी दूर झाल्या नाहीत.
- दुतावासांच्या मते, त्यांच्या खर्चासाठीही मर्यादा घालणे हे व्हिएन्ना कनव्हेंन्शनचे व्हॉयलेशन आहे.
- काही देश भारताला कठोर संदेश देण्यासाठी त्यांच्या ठिकाणच्या इंडियन अॅम्बेसीजवरही बँकेतून रक्कम काढण्यावर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत.

पाकिस्तानसह अनेक देशांची तक्रार..
- यापूर्वी पाकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, इथियोपिया आणि सुडानननेही नोटबंदीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
- पाकिस्तानी दुतावासाच्या तक्रारी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चर्चेतून हा प्रश्न सोडवला.
- हे प्रकरण उच्चायुक्तालय आणि एका प्रायव्हेट बँकिंग अथॉरिटीदरम्यानचे होते.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...