आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीवर बोलले राष्‍ट्रपती मुखर्जी, गरिबांना अडचणीतून बाहेर काढण्‍यासाठी सरकारने द्यावे अधिक लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नविन वर्षाच्‍या राष्‍ट्राला शुभेच्‍छा देताना, राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नोटबंदीवर भाष्‍य केले. यावेळी राष्‍ट्रपती म्‍हणाले, काळा पैसा आणि भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील लढाईसाठी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे सामान्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्‍यांना अडचणींतून बाहेर काढण्‍यासाठी सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे. नोटबंदीमुळे देशभरातील व्‍यवहार मंदावल्‍यामुळे अर्थव्‍यवस्‍थेत काही काळ मंदी येऊ शकते. यासाठी केंद्र सरकारने सतर्क राहिले पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला. नोटबंदीमुळे देशातील काळा पैसा समोर आला आहे. देशाला याचा फायदाच होईल, असेही मुखर्जी यावेळी म्‍हणाले. गुरुवारी व्हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे राष्‍ट्रपतींनी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी राज्‍यपाल आणि  उपराज्‍यपाल यांना नववर्षाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. 
काय म्‍हणाले राष्‍ट्रपती 
 
- नोटबंदीमुळे सामान्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. यापासून त्‍यांची लवकरात लवकर सूटका करावी लागेल. तरच या निर्णयाचा भविष्‍यात फायदा मिळू शकतो. यासाठी सरकारने विशेष लक्ष देण्‍याची गरज आहे. 
- राष्‍ट्रपती म्‍हणाले, गरीबांच्‍या विकासासाठी  अधिक काम होण्‍याची आवश्‍यकता आहे. आजही भारतातील बहुसंख्‍य गरीब भूख, बेरोजगारी आणि शोषणाने त्रस्‍त आहेत. त्‍यांना यापासून मुक्‍त केले पाहिजे.
 
पाच राज्‍यातील निवडणुकांवर  केले भाष्‍य 
- राष्‍ट्रपती म्‍हणाले, पाच राज्‍यातील निवडणुकांच्‍या तारखा जाहिर झाल्‍या आहेत. मुक्‍त आणि प्रामाणिक निवडणुका लोकशाहिला मज‍बुत करण्‍याचे काम करते. 
- निवडणुकाच या देशाला महान लोकशाही राष्‍ट्र बनवते. जनता आपल्‍या पसंतीनूसार मतदानाद्वारे लोकशाहित शासन निवडत असते. या सर्व प्रक्रीयेमध्‍ये राज्‍यपालांची महत्‍वाची भूमिका असते. निवडणुकांदरम्‍यान होणारा तणाव कमी करण्‍यासाठी ते मदत करु शकतात. 
- मुखर्जी म्‍हणाले, देशात अनेक विचारधारांचे लोक एकत्र राहतात. विविधतेत एकता ही देशाची ओळख आहे. ही ओळखच देशाला खास बनवते. देशाच्‍या विकासासाठी सर्वांच्‍या गुड विलची आवश्‍यकता आहे. 
 
उच्‍च शिक्षणावरही बोलले 
- राष्‍ट्रपती म्‍हणाले की, राज्‍यपाल आणि उपराज्‍यपाल हे राज्‍यातील विद्यापीठांचे कुलपती असतात. त्‍यामुळे राज्‍यातील उच्‍च शिक्षणाच्‍या विकासामध्‍ये ते महत्‍तवाचे काम करु शकतात. राज्‍यातील शैक्षणिक संस्‍थांचा दर्जा सुधारावा यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले पाहिजे.  
- राष्‍ट्रपतींनी यावेळी राज्‍यपाल आणि उपराज्‍यपाल यांना सल्‍ला दिला की, आपापल्‍या राज्‍यातील कला आणि संस्‍कृती यांना समोर आणण्‍यासाठी तुम्‍ही विशेष प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)    
बातम्या आणखी आहेत...