आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकनगुनियाने दिल्लीत 5 जण दगावले, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केजरी म्हणाले दलाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सोमवारी चिकुनगुन्यामुळे पाच बळी गेले आहेत. डेंग्यू, मलेरियामुळे १० जण दगावले. त्यामुळे आरोग्य विभागाची पोलखोल झाली आहे. त्यावरून आता राजकारणही पेटले आहे. दिल्लीतील सत्ताधारी आप पक्षाचे निम्मे मंत्रिमंडळ आऊट ऑफ स्टेशन आहे. त्यावरून विरोधकांनी दिल्ली सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

चिकुनगुन्यामुळे सोमवारी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये आणखी दोन चिकुनगुन्याच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिकुनगुन्याने मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण ३ वर गेली आहे. चिकुनगुन्याची चाचणी पॉझिटिव्ह असलेली हजारावर प्रकरणे दिल्लीत उघड झाली आहेत. त्यामुळे दिल्लीत चिकुनगुन्याची जणू दहशतच निर्माण झाल्यासारखे झाले. ६५ वर्षीय रमेंद्र पांडेय यांचा काल या आजारामुळे सर गंगाराम रुग्णालयात मृत्यू झाला. इतर दोन चिकुनगुन्याचे मृत्यूदेखील याच रुग्णालयात झाले आहेत. यातील सर्वच रुग्ण ६० वर्षे वयावरील आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. अजून एका रुग्णाचा चिकुनगुन्यामुळे एम्स रुग्णालयात मृत्यू झाल्याचे कळते; मात्र, हे अद्याप निश्चित व्हावयाचे आहे. त्यामुळे अद्याप तरी तो रुग्ण संशयितच असेल, असा दावा एम्सच्या प्रवक्त्या अमित गुप्ता यांनी केला. राजधानीत चिकुनगुन्याच्या रुग्णात सातत्याने वाढच होताना दिसते आहे. महापालिकेच्या अहवालानुसार १०५७ प्रकरणे याची आहेत.
दिल्लीत चिकनगुनिया-डेंग्यू
- सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
- गाझियाबादमध्ये राहाणाऱ्या एका 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला क्रिटिकल कंडिशनमध्ये सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू चिकनगुनियामुळे झाला.
- मिळालेल्या माहितीनुसार, चिकनगुनियामुळे झालेला हा दिल्लीतील पहिला मृत्यू होता. यंदा दिल्लीत चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत.
दिल्लीत आतापर्यंत 1057 आणि डेंग्यूचे 1158 प्रकरणे समोर आले आहेत. याला महापालिकेच्या आरोग्य विभागानेही दुजोरा दिला आहे.
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) येथे आतापर्यंत 900 पेक्षा जास्त चिकनगुनिया-डेंग्यूचे पेशंट्स आढळले आहेत. तर, सफदरगंज येथे 532 आणि लोकनायक हॉस्पिटलमध्ये 281 पेशंट्स दाखल आहेत.
- गेल्या वर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या 15867 होती, त्यात 60 जणांचा मृत्यू झाला होता.
पत्रकारांवर का भडकले केजरीवाल ?
- प्रसिद्ध पत्रकार शेखर गुप्ता यांनी एका ट्विटमध्ये म्हटले, 'पाच वर्षांमध्ये प्रथमच दिल्लीत मलेरियाने धुमाकूळ घातला आहे. प्रथमच चिकनगुनियामुळे एक जण दगावला आहे. असे असताना दिल्ली सरकार गोवा, पंजाब आणि यूपी जिंकण्यात व्यस्त आहे.'
- या ट्विटरवर केजरीवाल भडकले. त्यांनी प्रत्युत्तर दिले. 'राजकारण करायचे असेल तर उघडपणे समोर या. आधी काँग्रेसची दलाली करत होते, आता मोदींची? अशा लोकांनी पत्रकारिता बिघडवली आहे.'
दिल्लीचे अर्धे मंत्रिमंडळ शहराबाहेर
दिल्लीत चिकुनगुन्याचा वेगाने फैलाव होत असतानाच्या तणावपूर्ण व गुंतागुंतीच्या परिस्थितीत दिल्ली सरकारचे अर्धे मंत्री आऊट ऑफ स्टेशन होते. यात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय आणि इम्रान हुसेन यांचा समावेश आहे. त्यात केजरीवाल गळ्याच्या संसर्गावरील उपचारासाठी बंगळुरूत तर सिसोदया फिनलंडमध्ये आहेत. आरोग्य मंत्री असलेले जैन मंगळवारी दिवसभर गोव्यात होते. नायब राज्यपाल नजीब जंग देखील परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे दिल्लीला वाऱ्यावर सोडल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोणत्या पत्रकाराला म्हणाले दलाल...
> काय आहेत चिकनगुनियाची लक्षणे
बातम्या आणखी आहेत...