आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली, लखनऊ, कानपूरसह उत्तर भारतात धुक्याची चादर; विमान उड्डाणांवर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली, एनसीआर, लखनऊ आणि कानपूर येथे बुधवारी सकाळपासून दाट धुके पसरले आहे. याचा विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. व्हिजिबिलिटी अतिशय कमी झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील हे पहिले धुके आहे ज्यामुळे फ्लाइट्स आणि वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्याची चादर
- पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिमी उत्तर प्रदेशसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी व्हिजिबिलिटी कमी असल्याची माहिती आहे.
- या भागातील वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. विशेषतः दिल्ली, नोएडा आणि दिल्ली - गुडगाव एक्स्प्रेसवेवर वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
- दिल्लीतील अनेक विमान उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे.
- बुधवारी सकाळी पारा खाली आला आहे.

तपमान १० डिग्रीच्या खाली
- दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी अनेक ठिकाणी आकाश निरभ्र होते. मात्र बुधवारी अचानक दाट धुके पसरले. सरासरी तपमान ९.७ डिग्री नोंदविले गेले.
- सोमवारी शहराचे कमाल तपमाना २९.२ डिग्री सेल्सियस तर किमान तपमान १३.८ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले होते.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...