आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्यांच्या खात्यात बेहिशेबी नोटा; सात वर्षांची शिक्षा हाेणार, प्राप्तिकर विभाग करेल कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने दुसऱ्यांच्या बँक खात्यात बेहिशेबी जुन्या नोटा भरणाऱ्यांना इशारा दिला आहे. विभागानुसार, अशी कृती करणाऱ्या व्यक्तींना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय ज्यांच्या खात्यात हे पैसे भरण्यात आले त्यांच्याविरुद्धही कारवाई होऊ शकते. त्यामुळे असे काही करू नका,असा सल्ला देण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभागाने दुसऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींविरोधात बेहिशेबी व्यवहार अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दंड व खटला गुदरण्याशिवाय सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशी काही प्रकरणे समोर आली असून त्यांच्याविरुद्ध नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे. एका अधिकृत सूत्रानुसार, विभागाने नोटबंदीनंतर ८० सर्व्हे व ३० ठिकाणी धाडीत २०० कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघड केले. अनेक राज्यांत जवळपास ५० कोटी रुपये जप्त करण्यात आले.

सूत्रांनुसार, प्राप्तिकर विभाग ज्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत, अशा संशयास्पद खात्यांची ओळख पटवून कारवाई करत आहे. खातेदार पैशाचा स्रोत सांगण्यास असमर्थ ठरल्यास रक्कम जप्त केली जाईल. याशिवाय त्यांच्यावर बेहिशेबी संपत्तीच्या २५ टक्के दंडही आकारला जाईल. सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...