आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Delhi Election : राम रहीमने दर्शवला भाजपला पाठिंबा, AAP ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना भाजपला मत देण्याची विनंती केली आहे. गुरमित राम रहीम यांच्या या धार्मिक संघटनेने हरियाणा विधानसभा निवडणुकीतही समर्थकांना भाजपला मत देण्याची विनंती केली होती. दरम्यान, डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहीम यांच्या मँसेंजर ऑफ गॉड (एमएसजी) चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्गही मोकळा झाला आहे.

फोटो - अरविंद केजरीवाल यांनी केलेले ट्वीट, यात त्यांनी भाजपची तुलना कौरवांबरोबर केली होती.

भाजपला समर्थन देण्याचा निर्णय डेराच्या राजकीय विंगने घेतला आहे. डेरा सच्चा सौदाचे राजकीय विंगचे अध्यक्ष अमन कुमार इन्सान यांनी त्याला दुजोरा दिला आहे. डेरा सच्चा सौदानुसार दिल्लीत त्यांचे 20 लाख समर्थक असून सुमारे 12 लाख मतदार आहेत. पाठिंबाच्या घोषणेनंतर डेरा समर्थक दिल्लीत आज भाजपसाठी प्रचारही करण्याची शक्यता आहे. डेरा सच्चा सौदाच्या राजकीय विंगचे सदस्य प्रदीप कुमार इन्सान म्हणाले की, दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते राम रहीम यांना भेटण्यासाठी आले होते. त्या सर्वांनी निवडणुकीत पाठिंब्याची मागणी केली होती. त्याच्या मोबदल्यात सर्वांनी विविध सामाजिक अपप्रवृत्तींच्या विरोधात मोहीम राबवण्यास सांगितले होते.

'आप' ची प्रतिक्रिया
डेराच्या या निर्णयावर आम आदमी पार्टीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपचे नेते योगेंद्र यादव ट्वीटद्वारे म्हणाले की, मॅसेंजर ऑफ गॉडच्या मुद्यावर संपूर्ण सेंसॉर बोर्डाची हकालपट्टी का झाली ते आज आम्हाला समजले.
पुढे वाचा, केजरीवाल यांनी भाजपला ठरवले कौरव...