आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्स असल्याचे सांगून बाबापासून दूर पळायच्या मुली, संमोहनासाठी होता खास जाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला सीबीआय कोर्टाने प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. - Divya Marathi
दोन बलात्कार प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला सीबीआय कोर्टाने प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
चंदीगड/नवी दिल्ली - दोन साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात 20 वर्षे तुरुंगावसाची शिक्षा भोगणाऱ्या बाबा राम रहिमच्या काळ्या कृत्यांचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. साध्वी म्हणून डेऱ्यात राहिलेल्या महिलेन सांगितले की बाबा राम रहिम रोज नवीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. या घृणास्पद कृत्याला डेरामध्ये 'पिताजी की माफी' करार दिला जात होता. 
 
रात्रीच्यावेळी आपल्या गुहेत बोलावून घेत होता.. 
- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमला त्याचे अनुयायी 'पापाजी' किंवा 'पिताजी' म्हणून संबोधत होते.
- एकाकाळी बाबाच्या भूलथापांना बळी पडून डेरामध्ये साध्वी म्हणून राहिलेल्या महिलेने आता त्याचे काळेकृत्य कथन केले आहे.
- एका मीडिया ग्रुपला महिलेने सांगिले की बाबा रात्रीच्यावेळी अनेक साध्वींनी आपल्या रुममध्ये (ज्याला डेऱ्यात गुहा म्हटले जात होते) बोलावून घेत होता. गुहेत आलेल्या महिलेंपैकी जी पसंत पडले तिला राम रहिम तिथेच थांबवून घ्यायचा. 
- एक दिवस या साध्वीलाही राम रहिमच्या गुहेत जावे लागले होते, आणि तिलाच बाबाने थांबण्यास सांगितले. 
- जेव्हा 'माफी' देण्याची वेळ आली तेव्हा महिला भयभीत झाली होती.   
 
 नकार ऐकायची सवय नव्हती 
- राम रहिमला नाही ऐकण्याची सवय नव्हती. तो नकार सहन करु शकत नव्हता. त्यामुळे डेरामधील मुलींमध्ये त्याची एवढी दहशत होती की कोणीही त्याला नाही म्हणत नव्हते. 
- साध्वींमध्ये बाबाची दहशत यासाठी होती की बाबा डेरामधील मुलींना धमकवायचा की बाहेर तोंड उघडले तर तुमच्या भाऊ आणि घरच्यांचा मर्डर करुन टाकू. त्याने एका साध्वीच्या भावाला मारले देखील होते. 
- बाबाच्या गुहेत पोहोचलेल्या या साध्वीने फारच हुषारीने परिस्थिती सांभाळली, ती राम रहिमला म्हमाली, सध्या माझे पीरियड्स सुरु आहे. त्यामुळे मी तुमच्या जवळ येऊ शकत नाही. 
- हे इतर साध्वींना कळाल्यानंतर अनेकींनी बाबाच्या तावडीतून सुटण्यासाठी हीच आयडिया वापरली होती. 
 
तीन वर्षे पाहिला डेऱ्यामधील कारनामा
- हा खळबळजनक खुलासा करणारी साध्वी 1999 ते 2002 दरम्यान डेरा सच्चा सौदाच्या आश्रमात राहात होती. 
- नाव न छापण्याच्या आणि आपली ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर साध्वीने सांगितले, की राम रहिम एक विशेष प्रकारचा जाम मुलींना देत होता त्यामुळे त्या तो सांगेल ते ऐकण्यास तयार होत होत्या. जणू काही तो त्यांना मोहिनी घालत होता. 
- जाम प्याल्यानंतर सर्व 'पिताजी'च्या होऊन जात होत्या. 
 
गुहेतून निघायच्या किंचाळ्या 
- पूर्वाश्रमीच्या साध्वीने खुलासा केला की गुहेत एक खास प्रकारचा पेय पदार्थ दिला जात होता त्यानंतर महिलेसोबत घाणेरडे काम केले जात होते.
- बाबाच्या गुहे बाहेर पाहारा देणाऱ्या साध्वींना आतून नेहमी किंचाळण्याचे आवाज ऐकायला येत होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबाचे फोटोज् आणि जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...