आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed: What Rahul Gandhi Did For The 60 Days He Went Missing

राहुल गांधींच्‍या सुटीचे गूढ उकलले, थायलंडसह चार देशांचा 60 दिवसांचा दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्‍या दारून पराभवानंतर कॉंग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष राहुल गांधी हे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्‍या काळात तब्‍बल दोन महिन्‍यांच्‍या सुटीवर होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर भाजपने चौफेर टीका केली होती. या काळात राहुल हे 56 दिवस थायलंडमध्‍ये असल्‍याचे वृत्‍त आले होते. मात्र, त्‍यांनी 56 नव्‍हे तर 60 दिवसांत थायलंडसह पूर्व आशियातील कंबोडिया, म्यानमार आणि व्हिएतनाम या चार देशांचा दौरा केल्‍याचा खुलासा झाला आहे.
कधी आणि कुठे गेले होते राहुल ?
> 'इंडिया टुडे'च्‍या वृत्‍तानुसार, 16 फेब्रुवारी 2015 ला राहुल गांधी नवी दिल्लीवरून सरळ बॅकॉंकला पोहोचले. त्‍या ठिकाणी ते एक दिवस राहिले.
> 17 फेब्रुवारीला ते बँकॉकवरून कंबोडियाची राजधानी नोम पेन्हकडे रवाना झाले. तिथे ते 11 दिवस राहिले.
> 28 फेब्रुवरीला ते एका दिवसासाठी पुन्‍हा बॅंकॉकला आले होते.
> बँकॉकवरून राहुल म्यानमारला गेले. तिथे ते 1 ते 21 मार्च असे एकूण 21 दिवस होते.
> 22 मार्चला ते थायलँडला परत आले. या काळात त्‍यांनी अयुथायामध्‍ये बौद्धिस्ट हेरिटेज सेंटरला भेट दिली. येथे ते 9 दिवस होते.
> 31 मार्चला राहुल व्हिएतनामला गेले. पुन्‍हा 12 एप्रिलला बँकॉकला परत आले होते.
> 12 ते 16 एप्रिलदरम्‍यान ते बँकॉकमध्‍ये राहिले.
> 16 एप्रिलला राहुल बँकॉकवरून नवी दिल्लीला परत आले.
राहुल यांच्‍यासोबत कोण होते ?
> या विदेश सहलीवर राहुल यांच्‍यासोबत कॉंग्रेस नेते सतीश शर्मा यांचे पुत्र समीर होते.
> जेव्‍हा राहुल गांधी म्‍यानमारला जात होते तेव्‍हा सुरक्षेच्‍या अटीवरून स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) प्रश्‍न उपस्‍थ‍ित केला होता.
> नंतर एसपीजी अधिकाऱ्यांनी राहुल यांना बँकॉकलाच थांबवले होते.
> राहुल गांधी आणि त्‍यांच्‍या कुटुंबाला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) ची सुरक्षा मिळाली होती.
>सूत्रांनुसार, राहुल यांनी फेब्रुवारीमध्‍ये एसपीजीच्‍या परवानगी शिवाय या प्रवासाचे नियोजन केले होते. त्‍याला सरकारने मंजूरही दिली होती.
राहुल का गेले होते सुटीवर ?
राहुल यांनी या सुटीसाठी आपली आई तथा कॉंग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सोनिया गांधी यांच्‍याकडे अर्ज दिला होता. तत्‍कालीन राजकीय वातावरण आणि काँग्रेस पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात व्यक्त होण्यासाठी राहुल यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आणखी काही वेळ या विनंती अर्जातून मागितनला होता. त्‍यामुळे विश्रांतीसाठी ते सुटीवर गेले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...