आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Detective Woman Kills Her Live In Partner Police Inspector

\'लिव्‍ह इन\'मध्‍ये राहणा-या डिटेक्टीव्ह प्रेमिकेकडून एनकाऊंटर स्‍पेशलिस्‍टची हत्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ला पोलिस दलातील एका पोलिस निरिक्षकाची हत्‍या करण्‍यात आली. एका डिटेक्‍टीव्‍ह एजेंसी चालविणा-या महिलेसोबत त्‍याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या महिलेनेच त्‍याची हत्‍या करुन आत्‍महत्‍या केल्‍याचा संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

बद्रीश दत्त असे या निरिक्षकाचे नाव आहे. तर महिलेचे नाव गीता असे असून ती एक डिटेक्‍टीव्‍ह एजेंसी चालविते. प्राप्‍त माहितीनुसार, दोघेही मित्र आहेत. परंतु, तिने बद्रीशला सर्वप्रथम गोळी घातली आणि त्‍यानंतर स्‍वतःला गोळी घालून आत्‍महत्‍या केली. एका फ्लॅटमधून दोघाचे मृतदेह ताब्‍यात घेण्‍यात आले. घटनास्‍थळावरुन बद्रीश दत्तचे सर्व्हिस रिव्‍हॉल्‍वरही आढळले आहे. गीता बद्रीशवर नाराज होती. ती तुरुंगात असताना तो तिला भेटला नाही, यावरुन दोघांमध्‍ये वाद झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. दोघे लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्‍ये असल्‍याचीही माहिती आहे.