आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis Said All Government Services Should Be Online

सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात : देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्व प्रकारच्या सरकारी सेवा मोबाईल व वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या गेल्या पाहिजेत. कोणत्याही सेवांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागू नये, अशी व्यवस्था “जाम” च्या (जनधन-आधार-मोबाईल) माध्यमातून निर्माण होऊ शकते असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज “दिल्ली आर्थिक परिषदेत” व्यक्त केला.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाच्यावतीने ‘दिल्ली आर्थिक परिषदेच्या समारोप सत्रात ‘जाम (जनधन-आधार-मोबाईल) दृष्टिकोन, आव्हान आणि मार्ग’ या विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते. याप्रसंगी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.जयंत सिन्हा, केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रमुख उपस्थित होती. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात जनधन योजनेच्या माध्यमातून १ कोटी २५ लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली. यातील ५८ टक्के जनधन बँक खाती आधार कार्डाशी जोडण्यात आली आहेत आणि त्यांना रुपे कार्ड देण्यात आले आहे. आधार कार्डमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सुमारे ३५ % गैरव्यवहारास आळा बसला आहे.

नरेगाच्या मजुरांना देण्यात येणारे वेतन आधार कार्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात १०९ कोटी रुपयांचे वितरण नरेगाच्या मजुरांना आधार कार्डाद्वारे देण्यात आले आहे. या प्रणालीमुळे समाजाप्रती उत्तरदायित्व निर्माण झाले आहे. राज्य शासनाने सध्या ४२ सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या आहेत. २६ जानेवारीपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.