आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendrapal Singh Bhullar May Get Relief From Capital Punishment

आजारामुळे भुल्लरची फाशी टळू शकते!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या शिक्कामोर्तबानंतरही अतिरेकी देविंदरपालसिंग भुल्लरची फाशी आजारपणामुळे टळू शकते. भुल्लर अडीच वर्षांपासून रुग्णालयात मानसिक आजारावर उपचार घेत आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्याशिवाय त्याच्या फाशीची तारीख ठरवली जाऊ शकत नाही.

आत्महत्येच्या प्रवृत्तीमुळे भुल्लरला इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियर अँड अलाइड सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. अर्थात तुरुंगात त्याने कधी आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा आहे. परंतु इच्छाशक्तीच उरलेली नाही. तो पूर्णपणे बरा होणे कठीण आहे. मी तसे सांगू शकत नाही, असे संस्थेचे संचालक डॉ. निमेश देसाई म्हणतात.