आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 मुंबई हल्ला: अतिरेकी डेव्हिड हेडलीला भारताकडे सोपवण्याची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारने मुंबई हल्ल्यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेकडे वर्षभरासाठी अतिरेकी डेव्हिड हेडलीला सोपवण्याची मागणी केली आहे. याबरोबर त्याचा साथीदार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचीही मागणी केली आहे.

हेडलीपर्यंत पोहोचण्यासाठी भारताने अमेरिकी अधिकार्‍यांसोबत नव्याने प्रयत्न चालवले आहेत. अमेरिकी अधिकार्‍यांनी हेडलीला सोपवण्यास नकार दिल्यानंतर भारताने त्याच्या वर्षभराच्या कोठडीची मागणी केली आहे.

हल्ल्याची हेडलीकडून रेकी
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील हल्ल्याची रेकी हेडलीने केली होती. त्यासाठी त्याने मुंबईसह अनेक शहरांत वास्तव्य केले होते. राणा हेडलीचा सहकारी मानला जातो. भारतीय पथकाला हेडलीची चौकशी करण्याची एकदा संधी मिळाली आहे. मात्र, पथक राणापर्यंत पोहोचू शकले नाही. डेन्मार्कमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राणाला अमेरिकी न्यायालयाने 14 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मुंबई हल्ल्यासह 12 आरोपांत हेडलीला दोषी ठरवण्यात आले. त्याने विविध खटल्यांमध्ये सरकारी पक्षाला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

अमेरिका म्हणाली, विचार करू
अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांसोबत नुकत्याच झालेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित झाला. बैठकीत सहभागी एका अधिका-याने सांगितले की, आमच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन अमेरिकी अधिकार्‍यांनी दिले आहे.