आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devyani Khobragade Gets Exemption From Pre trial Court

कोर्टात हजर राहण्यापासून देवयानी खोब्रागडे यांना सूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेतील भारतीय महावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांच्याशी गैवर्तनावरून उभय देशांत निर्माण झालेला वाद सोमवारी काही अंशी कमी झाला. व्हिसामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप असलेल्या देवयानींना या प्रकरणी व्यक्तिश: कोर्टात हजर राहण्यापासून मुभा देण्यात आली आहे. 12 डिसेंबरला देवयानी यांना न्यूयॉर्कमध्ये अटक झाली होती. व्हिसातील खोटी माहिती व नोकरांना हक्कापेक्षा कमी वेतन दिल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यास दहा वर्षे कारावास होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर देवयानी यांना संपूर्ण राजकीय व कायदेशीर संरक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांची बदली संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात करण्यात आली होती.
दरम्यान, देवयानी यांच्याकडे नोकर म्हणून ठेवलेल्या महिलेच्या व्हिसाबाबत तसेच तिच्यासंबंधी अन्य माहिती सादर करण्यासाठी देण्यात आलेली सोमवारपर्यंतची मुदत वाढवण्याच्या दिशेने अमेरिकी वकिलातीने पाऊल टाकले आहे. यात संबंधित नोकर महिलेस दिल्या गेलेल्या वेतनाच्या माहितीचाही समावेश आहे.
देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करून त्यांची अंगझडती घेतल्यानंतर भारतातून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. या मुद्दय़ावरून दोन्ही देशांत राजनैतिक तणाव निर्माण झाला होता. मात्र, भारताने कठोर भूमिका घेतल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.