आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devyani Khobragade Statement On American Strip Investigation

निर्वस्त्र करून केली होती तपासणी, गुन्हेगारांसोबत डांबले -देवयानी खोब्रागडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय उच्चअधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी त्यांची कपडे उतरवून तपासणी करण्यात आल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच मला कुख्यात गुन्हेगारांसोबतही ठेवण्यात आले होते असा गंभीर आरोप देवयानी यांनी केला आहे. माझ्या खटल्यामध्ये मार्चनंतर कोणतीच प्रगती झाली नाही, मात्र हे प्रकरण लवकरच सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अटकेच्या 10 महिन्यांनंतर देवयानी या माध्यमांसमोर आल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, "मी माझ्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मात्र माझ्या घराबाहेरच डिप्लोमॅटीक सेक्यूरिटी ब्यूरोचे अधिकारी माझी वाट पाहात होते. अनेक विनंत्या केल्यानंतर त्यांनी मला अटक वॉरंट दाखवून घेऊन गेले.
मला राजनैतिक सूट मिळाली आहे, तुम्हाला माझ्यासोबत गुन्हेगारांसारखी वर्तणूक करता येणार नाही असे मी त्यांना वारंवार सांगितले. तरीही त्यांनी माझे काहीएक ऐकले नाही. माझ्या वकीलांशीही त्यांनी मला संपर्क साधू दिला नाही. ते मला युएस मार्शलच्या कार्यालयात घेऊन गेले. याठिकाणी फेडरल क्रिमिनलची प्रकरणे पाहिली जातात. सुदैवाने माझा मोबाईल काढून घ्यायच्या आगोदरच मी माझ्या पतीला आणि नणंदेला या संपूर्ण घटनेची माहिती देऊ शकले."

काय होते प्रकरण
डिसेंबर 2013 मध्ये देवयानी खोब्रागडे यांचे प्रकरण सर्वांसमोर आले होते. देवयानी त्यावेळी डेप्यूटी काऊंसलेट जनरल होत्या. देवयानी यांच्या विरोधात त्यांची मोलकरीण संगीता रिचडर्स हीने तक्रार दाखल केली आहे. देवयानीवर मोलकरणीने योग्य वेतन देत नसल्याचा आरोप केला. तसेच व्हिसामध्ये वीसामध्ये घोटाळा केला आहे. देवयानीला अडीच लाख डॉलरच्या बॉन्डवर जामीन मिळाला. त्यानंतर भारताकडून देवयानीला राजनैतिक सूट देण्यासाठी युएनमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर तेथून तिला भारतात बोलावले. त्यानंतर अमेरिकेमध्ये एका न्यायाधिशाने हे प्रकरण मार्चमध्ये फेटाळून लावले. मात्र दोन दिवसांनतर लगेचच देवयानी विरोधात दुसर्‍या एका आरोपाखाली पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, जवळच्या लोकांच्या बोलण्याने दुःख होते...