आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DGCA Grounds 11 Pilots Of GMR News In Divya Marathi

11 वैमानिक जमिनीवर; निकष पूर्तता न केल्याने निलंबनाची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हवाई वाहतूक नियामक संस्था डीजीसीएने जीएमआर कंपनीच्या 11 वैमानिकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. यामुळे निवडणुकीच्या काळात आघाडीच्या राजकीय नेत्यांना अन्य सेवेचा पर्याय शोधावा लागणार आहे.

जीएमआर कंपनीकडून पुरवल्या जाणार्‍या हवाई सेवेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. यामध्ये सोमवारी राहुल गांधी यांच्या भुवनेश्वर दौर्‍यावेळी आवश्यक चाचण्यांशिवाय विमानाचे उड्डाण झाल्याचे डीजीसीए सूत्रांनी सांगितले. यामध्ये वैमानिक, चालक दल सदस्यांच्या उड्डाणपूर्व चाचणीचा समावेश होता. ब्रेथ अ‍ॅनालायझर उपकरणही कार्यरत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. विमान कंपनीची कागदपत्रे आणि उपकरणाची तपासणी 12 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान करण्यात आली. यामध्ये डीजीसीएला अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यांचा उड्डाणपूर्व वैद्यकीय चाचणी अहवाल चुकीचा आढळून आल्याचा दावा सूत्रांनी व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी सोमवारच्या दौर्‍यासाठी जीएमआरच्या फाल्कन 2000-एलएक्स विमानाचा वापर केला होता. ते या कंपनीच्या हॉकर-750 तसेच दोन बेल चॉपरचाही वापर करतात. डीजीसीएने या प्रकरणात सर्व 11 वैमानिक व सहा चालक दल सदस्यांना पाच वर्षांसाठी निलंबन का केले जाऊ नये, या आशयाची नोटीस पाठवली आहे.