आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो-फ्लाय लिस्ट: गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर लादली जाऊ शकते आयुष्यभराची बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'डीजीसीए'ने गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांसाठी नो-फ्लाय लिस्टचे तीन टप्पे तयार केले आहे. - Divya Marathi
'डीजीसीए'ने गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांसाठी नो-फ्लाय लिस्टचे तीन टप्पे तयार केले आहे.
नवी दिल्ली- विमानातगोंधळ घालणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली. अशा प्रवाशांवर महिने ते आजीवन प्रवासबंदी घातली जाऊ शकते. या प्रवाशांच्या वर्तवणुकीसाठी टप्पे निश्चित केले आहेत. त्यात दोषी ठरल्यानंतर या वर्गवारीनुसार प्रवासबंदी लागू होईल. यात तोंडी छळवणूक सिद्ध झाली तर महिने, धक्काबुक्की केली तर महिने आणि तिसऱ्या टप्प्यात धमकी दिल्यास दाेन वर्षे ते अनिश्चित काळासाठी प्रवासबंदी लागू केली जाऊ शकते. 
 
 
अशा आहेत तीन लेव्हल 
#1 - पहिल्या कॅटेगरीमध्ये धमकीचा इशारा, हावभाव, मारण्याची धमकी किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असे वर्तन. यात दोषी आढळल्यास प्रवाशावर तीन महिन्यांपर्यंत विमान प्रवासबंदी लादली जाऊ शकते. 
 
#2 - दुसऱ्या लेव्हलमध्ये शारीरिक गैरवर्तनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धक्का देणे, पायाने मारणे, दाबून धरणे, लैंगिक अत्याचार, चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करणे. असे करणाऱ्या प्रवाशांवर 6 महिन्यांपर्यंत विमानप्रवास बंदी लादली जाऊ शकते. 
 
#3 - तिसऱ्या आणि शेवटच्या लेव्हलमध्ये ज्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असू शकते अशा गैरवर्तनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 2 वर्षे ते यापेक्षा जास्त काळापर्यंत बंदी घातली जाऊ शकते.  
बातम्या आणखी आहेत...