आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाका IS हल्ल्यात मराठी कनेक्शन, यांच्या विचारांनी दहशतवादी प्रभावीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. ढाका येथे झालेल्या हल्ल्यात 22 जणांचा बळी घेणारे दहशतवादी मुंबईतील इस्लामचे प्रचारक झाकिर नाईक यांच्या विचाराने प्रभावीत होते. एका दहशतवाद्याने सोशल साइट्सवर झाकिर नाईक यांचे, 'प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी झाले पाहिजे' हे वक्तव्य शेअर केले होते. तर, दुसरीकडे देशात नाईक यांच्या भाषण आणि संघटनेवर बंदीची मागणी केली जात आहे.

कोणी केली बंदीची मागणी
बांगलादेशी माध्यमामध्ये हे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यानंतर देशात झाकिर नाईक यांच्या भाषणांवर आणि संघटनेवर बंदीची मागणी केली जात आहे. रजा अॅकॅडमीने केंद्र आणि राज्य सरकारकडे नाईक यांच्या इस्लामिक रिचर्स फाऊंडेशनवर बंदीची मागणी केली आहे.
- त्यासोबतच नाईक यांचे दहशतवाद्यांसोबत काय संबंध आहेत, त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, याच्या चौकशीचीही मागणी केली आहे.
नाईक पुन्हा वादात
- जगभरात सुटा-बुटात राहून इस्लामचा प्रचार करणारे डॉक्टर झाकिर नाईक पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. बांगलादेशात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या दोन दहशतवाद्यांनी ते नाईक यांचे अनुयायी असल्याचे म्हटले आहे.
- डॉ. झाकिर नाईक हे ओसामा बिन लादेनला दहशतवादी मानत नाहीत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले नाईक.... कसा झाला हा दहशतवादी हल्ला... बहुतेक दहशतवादी उच्च शिक्षित... सर्वांचे चिरले गळे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...