आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडच्या कोळसा खाणी पेटल्या; 19 रेल्वेगाड्या बंद, तब्बल 2,750 कोटींचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / रांची - धनबाद ते चंद्रपूरा पर्यंतच्या कोळसा खाणींमध्ये आग लागली आहे. त्यामुळे, 35 किमी पर्यंतचा रेलवेमार्ग पूर्णपणे बंद करावा लागला आहे. रेलवे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जून पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे 19 रेल्वेगाड्या बंद पडतील. यातून तब्बल 2750 कोटी रुपयांचे नुकसान होईल असा अंदाज लावला जात आहे. 
 
- रेलवे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडच्या धनबाद येथून चंद्रपुरा पर्यंत जाणाऱ्या 35 किमीचा लोहमार्ग आणि मालगाड्यांची ये-जा 15 जूनपासून पूर्णपणे बंद केली जाणार आहे. या निर्णयामुळे, रेलवे विभागाला 2750 कोटी रुपयांचे नुकसान होईल. 
- कोळसा कंपन्या, कोळसा सचिव आणि रेलवे अधिकारी या मुद्यावर चर्चा करत आहेत. कोळसा वाहतुकीचा मार्ग बदलून 1500 कोटी रुपये कसे वाचवता येईल असे प्रयत्न रेलवे विभागाकडून केले जात आहेत. 1.5 कोटी टन कोळसा इतर ठिकाणावरून उचलून मालवाहतुकीचे 1000 कोटी रुपये वाचवले जाऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
ह्या 13 रेलवे ठप्प
 
1. दरभंगा - सिकंदराबाद एक्सप्रेस (बाय वीकली)
2. रांची - भागलपूर - वनांचल एक्सप्रेस (डेली)
3. हावड़ा - भोपाळ एक्सप्रेस (वीकली)
4. अजमेर - हावड़ा/ सियालदाह एक्सप्रेस (वीकली)
5. धनबाद- भुवनेश्वर गरीब रथ एक्सप्रेस (ट्राय वीकली)
6. मालदा - सुरत एक्सप्रेस (वीकली)
7. रांची - कामाख्या एक्सप्रेस (बाय वीकली)
8. रांची - जयनगर एक्सप्रेस (ट्राय वीकली)
9. रांची - हावड़ा इंटरसिटी एक्सप्रेस (ट्राय वीकली)
10. रांची - भागलपुर एक्सप्रेस (ट्राय वीकली)
11. रांची - न्यू जलपायगुडी एक्सप्रेस (वीकली)
12. हैदराबाद - रक्सॉल एक्सप्रेस (वीकली)
13. कोलकाता - अहमदाबाद एक्सप्रेस (वीकली)
 
ह्या 6 पॅसेंजर ट्रेन रद्द
1. मुरी - धनबाद
2. चंद्रपुरा - भोजीडीह
3. बोकारो - हावड़ा
4. रांची - धनबाद
5. चंद्रपुरा - धनबाद
6. झाड़ग्राम - धनबाद
 
ह्या 7 गाड्यांचे रूट बदलले
1. हावडा - रांची शताब्दी एक्सप्रेस व्हाया गोमो
2. हावडा - जबलपूर शक्तिकुंज एक्सप्रेस व्हाया गोमो
3. रांची - गोरखपूर मौर्य एक्सप्रेस व्हाया गोमो
4. अलेप्पी एक्सप्रेस व्हाया गोमो
5. धनबाद - रांची इंटरसिटी - व्हाया असनसोल
6. रांची- दुमका इंटरसिटी वाया असनसोल
7. रांची - पाटणा पाटलिपुत्र एक्सप्रेस व्हाया असनसोल
 
बातम्या आणखी आहेत...