आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni Sachin In Forbes Top 100 Rich Athletes List

महेंद्रसिंह धोनीची रोजची कमाई 50 लाख रुपये !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वाधिक उत्पन्न असलेल्या जगातील 100 खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 16 वा क्रमांक पटकावला आहे. फोर्ब्स नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या यादीत धोनीचे वार्षिक उत्पन्न 3 कोटी 15 लाख डॉलर अर्थात 179 कोटी रुपये आहे.

फॉर्मूला वनचा स्टार फर्नांडो अलोंसा (3 कोटी डॉलर). टेनिसचा बादशाह नोवाक जोकोविच (2.69 कोटी डॉलर) आणि सर्वाधिक वेगवान उसेन बोल्ट पेक्षा तो पुढे आहे.

फोर्ब्सने खेळाडूंच्या 2012 मधील उत्पन्नाच्या आधारावर ही यादी तयार केली आहे. गोल्फचा अनिभिषिक्त सम्राट अमेरिकेचा टायगर वुड्स पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 80 लाख डॉलर आहे. 17 ग्रँड स्लॅम स्पर्धांचा विजेता असलेला स्वित्झर्लंडचा रोजर फेडरर 7 कोटी 10 लाख डॉलर उत्पन्नासह दुस-या स्थानी आहे. तर, नुकताच आयपीएलमधून निवृत्ती स्विकारलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 51 व्या क्रमांकावर आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न दोन कोटी 20 लाख डॉलर आहे. त्यातील एक कोटी 80 लाख डॉलर जाहिरात आणि 40 लाख डॉलरचे उत्पन्न क्रिकेट आणि पारितोषिकांच्या माध्यमातून होते. फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत दोनच क्रिकेटरचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे दोघेही भारतीय आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, कुमारी मातेच्या पोटी जन्मलेला मुलगा चौथ्या क्रमांकावर