आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका डॉक्टरच्या शंकेवरून मधुमेहाच्या औषधावर संपूर्ण देशभरात घातली बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुमेहाच्या एका औषधाच्या दुष्परिणामांबाबत पंतप्रधान कार्यालयाने आरोग्य मंत्रालयास एक पत्र पाठवले. मंत्रालयाला तो आदेशच वाटला आणि मंत्रालयाने संपूर्ण देशभरात त्या औषधावर थेट बंदी घातली. बंदीची प्रक्रियाही पूर्ण केली नाहीच, शिवाय संबंधित डॉक्टरने या औषधावर अधिक संशोधनाची गरज व्यक्त केली आहे, याकडेही लक्ष दिले नाही. हे औषध आहे पायोग्लिटाझोन. देशभरातील 35 लाख मधुमेही रुग्ण हे औषध वापरतात.

पंतप्रधान कार्यालयातून पत्र येताच, आरोग्य मंत्रालयाने तत्काळ या औषधावर बंदीच्या हालचाल सुरू केल्या. त्यासाठी औषध सल्लागार मंडळालाही विश्वासात घेतले नाही. बंदी लागू करताना, या औषधाच्या अधिकृत संशोधनाच्या निष्कर्षाकडेही कानाडोळा केला. या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा, 11 तज्ज्ञांची समिती नेमून महिनाभरातच बंदी मागे घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव डॉ. अरुणकुमार पांडा यांच्या मते, आरोग्याच्या मुद्दय़ांवर संसदेच्या स्थायी समितीने विदेशात धोकादायक म्हणून ज्या औषधांवर बंदी आहे, त्यावर देशातही बंदी घालण्याची शिफारस केल्याने, ती स्वीकारून पायोग्लिटाझोनवर बंदी घालण्यात आली. गेल्या महिन्यात राष्ट्रीय औषधी महानियंत्रकांनीही या औषधावर बंदीची शिफारस केल्याचे डॉ. पांडा म्हणाले.


(चेन्नईहून अरुण स्वामिनाथन नवी दिल्लीहून प्रदीप सुरीन यांचा स्पेशल रिपोर्ट)