आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकसोबतची सागरी सुरक्षा चर्चा रद्द; पाकिस्तानच्या अडेलतट्टूपणाला भारताचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानात भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारतात संतापाची भावना आहे. भारताने वारंवार विनंती करूनही पाकने जाधव यांना भारतीय वकिलातीशी संपर्क करू देण्यास नकार दिला आहे. या  पार्श्वभूमीवर भारताने पुढच्या आठवड्यात पाकिस्तानसोबत होणारी सागरी सुरक्षा चर्चेसाठीची बैठक तडकाफडकी रद्द केली आहे.  
 
पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा संस्थेचे एक शिष्टमंडळ मच्छीमार, शोध व बचावमोहिमेच्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी १६ ते १९ एप्रिलदरम्यान नवी दिल्लीत येणार होते. उभय देशांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा होणार होती. तटरक्षक दलाच्या सूत्रांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने पाक शिष्टमंडळाच्या दौऱ्याला परवानगी नाकारली आहे.   

पीओकेमध्ये ‘रॉ’चे तीन एजंट पकडल्याचा पोलिसांचा दावा
पाकव्याप्त काश्मिरातील  (पीओके) पोलिसांनी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे तीन संशयित गुप्तहेर पकडल्याचा दावा केला आहे. हे तिघेही पाकव्याप्त काश्मिरातीलच अब्बासपूर जिल्ह्याच्या तारोती गावाचे रहिवासी आहेत. पूंछचे डीएसपी साजिद इम्रान यांनी सांगितले की, खलील नावाच्या एका संशयिताने नोव्हेंबर २०१४ मध्ये काश्मीरला भेट दिली होती, तेथे तो रॉच्या संपर्कात आला.
बातम्या आणखी आहेत...