आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेहाची औषधे स्वस्त होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मधुमेहाच्या पेटंट असणा-या महागड्या औषधींवर केंद्र सरकारची नजर असून देशातील मधुमेहींची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालय मधुमेहाच्या काही औषधांसाठी परवान्याची शिफारस करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पेटंट असणा-या औषधांचे जेनेरिक व्हर्जन बनवण्याचे अधिकार देशातील कंपनीला मिळतील. त्यामुळे ही औषधे स्वस्त होतील.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिका-याच्या मते, मधुमेहाची महागडी औषधे आणि या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही औषधांसाठी परवाना पद्धत लागू करण्याची शिफारस सरकारने नेमलेली समिती करणार आहे. ती लागू झाल्यास औषधे स्वस्त होतील.