आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंदी घातलेले मधुमेहाचे औषध ‘पायोग्लिटाझोन’ पुन्हा मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मधुमेही रुग्णांसाठी ‘पायोग्लिटाझोन’ ही औषधी पुन्हा उपलब्ध होऊ शकणार आहे. आरोग्य मंत्रालयाने या औषधावर बंदी घातली होती. बंदी उठवण्याच्या प्रस्तावाला मंत्रालयाने सशर्त मंजुरी दिली आहे.

ड्रग टेक्निकल अँडव्हायझरी बोर्डाने (डीटीएबी)‘पायोग्लिटाझोन’ हे औषध रुग्णांसाठी सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे. केंद्रीय संयुक्त आरोग्य सचिव डॉ. अरुणकुमार पांडा यांनी सांगितले की, या औषधची फेरविक्री करण्याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल. एका अधिकार्‍याने सांगितले की, या औषधांच्या विक्रीस परवानगी देताना सरकारने तीन अटी ठेवल्या आहेत. मधुमेहावरील रुग्णांवर करण्यात येणार्‍या उपचारांच्या पहिल्या र्शेणीतील औषधांमध्ये ‘पायोग्लिटाझोन’चा समावेश करण्यात येऊ नये. या औषधांची विक्री बॉक्सवरील इशार्‍यासह करण्यात यावी. त्याच बरोबर गोळ्यांच्या पॉकेटमध्येही इशारा देणारी चिठ्ठी टाकण्यात यावी या त्या तीन अटी आहेत. औषधांचा बॉक्स आणि पॅकेटमध्ये या गोळीच्या सेवनाचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचे सेवन डॉक्टरी सल्ल्यानेच करावे, असा इशारा छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.