आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेलच्या दरात ४५ पैशांची वाढ ; आता मुंबईत ५४ रुपये ८३ पैसे प्रतिलिटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नवी दिल्ली- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महिनाभरासाठी तहकूब होताच सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून डिझेल प्रतिलिटर 45 पैशांनी महाग केले आहे. यात व्हॅट आणि स्थानिक करांचा समावेश नाही. जानेवारीपासून डिझेलमध्ये तीन टप्प्यांत दीड रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे.


या दरवाढीनंतर औरंगाबादेत डिझेल 55.91 रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या डिझेल दरात दरमहा 50 पैशांपर्यंत वाढ करणार असल्याची घोषणा केंद्राने जानेवारीत केली होती. दरवाढीनंतरही कंपन्यांना डिझेलवर लिटरमागे 8.19 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 16 मार्च रोजी पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त झाले होते.