आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्या फाशीवरून सुप्रीम काेर्टातच मतभेद, निर्णयासाठी नवे पीठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- (इन्सेटमध्ये) याकूब मेमनला अटक झाली तेेव्हा तो अगदी तरुण दिसायचा. पण आता तुरुंंगात असलेला याकूब असा दिसतो. त्याने नुकतीच बीएची परिक्षा दिली होती. त्यावेळी त्याने हा फोटो फॉर्मवर लावला होता.)
नवी दिल्ली - मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी याकूब मेमनच्या डेथ वॉरंटच्या मुद्द्यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठात मतभेद झाले. न्यायमूर्ती ए. आर. दवे यांनी याकूबचा अर्ज फेटाळला. पण न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी डेथ वॉरंटला स्थगिती दिली. त्यानंतर याबाबतचा निकाल सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्यावर सोडून दिला.

याकूबच्या याचिकेवर विचार करण्यासाठी आता नवे न्यायपीठ स्थापले जाईल, अशी माहिती सरन्यायाधीश दत्तू यांनी सायंकाळी दिली. हे न्यायपीठ बुधवारी सुनावणी करेल, अशी अपेक्षा आहे. टाडा न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानुसार याकूबच्या ३० जुलैला त्याला फाशी होईल. सर्व पर्याय संपले नाहीत, असे म्हणून याकूबने डेथ वॉरंटला आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याच महिन्यात त्याची क्युरेटिव्ह पिटिशन रद्द केली होती. त्यानंतर त्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दया याचिका दिली.पण ती प्रलंबित आहे. त्यामुळे निकाल येण्याच्या आधीच आपल्याला फासावर लटकावले तर ते बेकायदेशीर ठरेल, असे त्याने याचिकेत म्हटले आहे.

जर एखाद्या गुन्ह्याची सजा राजाने दिली नाही तर त्याचे पाप त्याच्या माथी येते.
- न्यायमूर्ती दवे

डेथ वॉरंट स्थगित न केल्यास याकूबच्या घटनात्मक हक्कांचे हनन होईल.
- न्यायमूर्ती जोसेफ

पुढे वाचा... न्यायालयाचा नियम कुठे मोडला ?