आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Differences WIth Smriti Irani, Kakodakar Resigned From IIT Mumbai

स्मृती इराणींशी मतभेद, काकोडकरांचा आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद सोडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आयआयटी मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. दरम्यान, इराणी यांनी काकोडकर यांना कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पदावर राहण्यास सांगितले आहे. काकोडकर यांनी ते मान्य केले आहे.
काकोडकर यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत आहे. ‘मी माझे राजीनामापत्र पाठवले आहे,’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. सूत्रांनुसार, आयआयटी पाटणा, भुवनेश्वर व रोपड येथील संचालकांच्या निवडीवरून काकोडकर- इराणी यांच्यात मतभेद आहेत. या निवडीशी संबंधित शोध व निवड समितीची बैठक २२ मार्चला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील सूत्रांनुसार, आयआयटी पाटणा आणि भुवनेश्वर येथील नवीन संचालकांच्या निवडीबाबत सहमती होती. पण रोपडच्या संचालक नियुक्तीवरून मतभेद होते.

काँग्रेसची स्मृतींवर टीका : डॉ. काकोडकर यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसने स्मृती इराणी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव गौडा म्हणाले की, स्मृती इराणी उच्च शिक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये वारंवार हस्तक्षेप करत आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घ्यावा.

आर. शेवगावकरांचा राजीनामा प्रलंबितच
आयआयटी दिल्लीचे संचालक आर. शेवगावकर यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. सरकारशी मतभेद झाल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. शेवगावकर यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.