आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Differently Abled Women Tops UPSC, Result\'s Declared

UPSC:टॉप-१० मध्ये ५ लेकींची बाजी, ६०% अपंग इरा सिंघल देशात अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरा सिंघल. - Divya Marathi
इरा सिंघल.
नवी दिल्ली - आयएएस- आयपीएस बनवणाऱ्या यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत प्रथमच पहिल्या चार अव्वल क्रमांकावर तरुणींची निवड झाली आहे. शारीरिकदृष्ट्या ६० टक्के अपंग असलेली इरा सिंघल देशात पहिली आली. रेणू राजने पहिल्याच प्रयत्नात दुसरा क्रमांक पटकावला. निधी गुप्ता तिसऱ्या तर वंदना राव चौथ्या क्रमांकावर आहेत. सुहर्ष भगत हा पाचव्या क्रमांकावर आहे. तर सहाव्या क्रमांकावरही तरुणीच आहे. म्हणजेच टॉप-१० मध्ये ५ लेकीच! यापूर्वी २०१३ मध्ये टॉप-५ मध्ये भारती दीक्षित ही एकमेव मुलगी होती. यूपीएससीने पहिल्यादांच मुलाखतीनंतर चौथ्याच दिवशी परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.
१२३६ उमेदवारांची निवड
५९० खुला
३५४ ओबीसी
१९४ एससी
९८ एसटी
एकूण १३६४ पदे भरायची आहेत. उर्वरित १२८ पदांसाठी २५४ नावे प्रतीक्षा यादीत आहेत. त्यापैकी १२७ खुला, १०५ ओबीसी, १९ एससी आणि तीन एसटी उमेदवारांचा समावेश आहे.
फक्त ०.२% च पात्र
देशभरातील ९.४५ लाख उमेदवारांनी नागरी सेवा परीक्षेचे अर्ज भरले. ४.५१ लाख जणांनी परीक्षा दिली. १६,९३३ उमेदवार मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. ३,३०८ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. १२३६ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. म्हणजेच प्रिलिम परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांपैकी केवळ ०.२ टक्केच उमेदवारांची निवड झाली आहे.
अबोली नरवणे महाराष्ट्रातून प्रथम
पुणे | अबोली नरवणे ही महाराष्ट्रातून प्रथम आली आहे. यूपीएससीच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत ती ७८ व्या क्रमांकावर आहे. अबोली एम. ए. इंग्रजी असून मागील वर्षी तिची आयआरएससाठी निवड झाली होती. यंदा मुख्य परीक्षेसाठी तिने राज्यशास्त्र हा विषय घेतला हाेता.
पुढील स्लाइड्सवर वाचा ..
प्रथम क्रमांक पटकावलेल्या इराचे मनोगत
मराठवाड्यानेही मारली बाजी महाराष्ट्रातील गुणवंत