आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Difficult To Block Porn Websites Says Central Government To SC

'चार कोटी पोर्न वेबसाइट्स, कोणा कोणाला बंद करणार'; केंद्राचे सुप्रीम कोर्टात उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोर्न वेबसाइट्सवर बंदी घालण्यात अडचणी येत असल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. केंद्र सरकारने म्हटले, 'आम्ही एका साइटवर बंदी घालतो तर, तोपर्यंत दुसरी सुरु झालेली असते. अशा चार कोटी साइट्स आहेत. सर्वांवर तर बंदी घालता येणार नाही.' यावर कोर्टाने, तंत्रज्ञान चमत्कार करु शकते तसेच ते विनाश देखील करु शकते. त्यामुळे केंद्र सरकारने पोर्न साइट्स विशेषतः चाइल्ड पोर्न संबंधीत साइट्स ब्लॉक करण्यासंबंधी पावले उचलली पाहिजे, असे सांगितले.
पोर्न वेबसाइट्स बंदीसाठी दाखल एका याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने केंद्र सरकारला लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले आहे. कोर्टाने म्हटले आहे, की कायदा, तंत्रज्ञान आणि प्रशासनाने एकत्र येऊन इंटरनेटवरील पोर्नोग्राफी रोखण्याचे काम केले पाहिजे. विशेषतः चाइल्ड पोर्नोग्राफी ब्लॉक करण्यासंबंधी लवकर निर्णय घ्यावा.
केंद्र सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे, की ज्या साइट्सचे सर्व्हर परदेशात आहे त्यांना ब्लॉक करणे अवघड आहे. भारत सरकार हे सर्व्हर भारतात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यामुळे या साइट्सवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.