आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशपेक्षा भारतात व्यवसाय करणे अवघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात व्यवसाय करणे आता बांगलादेशात व्यवसाय करण्यापेक्षा जास्त जोखमीचे आहे. लंडनमधील रिस्क अॅनालिसिस कंपनी वेरिस्क मॅपलक्रॉफ्टने व्यवसायासंदर्भात एक यादी जाहीर केली आहे. त्यात भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतात अशांती असल्याने येथे व्यवसाय करणे अवघड असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. भारताच्या अगोदर सिरिया, यमन आणि लिबिया या देशांना स्थान देण्यात आले आहे. बांगलादेश यादीत सातव्या स्थानावर आहे. रँकिंग ठरवण्यासाठी वेरिस्क मॅपलक्राफ्टने प्रत्येक देशातील महागाई स्तर, सोशल ग्रुप अनिश्चितता आणि राजकीय अस्थैर्य लक्षात घेऊन गुण दिले आहेत. यात शून्य गुण मिळवणाऱ्या देशात सर्वात कमी स्थिर आहेत, तर १० गुण मिळवणारे देश सर्वात जास्त स्थिर आहेत. कंपनीने अहवालात म्हटले आहे की, अशांती जास्त असल्याने व्यवसाय करण्याच्या प्रकारावर प्रभाव पडतो. विमानतळ आणि बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठीही अडचण होत असते. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही धोका असतो. व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने मे २०१६ मध्ये पावले उचलली आहेत. याशिवाय राज्यांनीही विविध सुधारणा करण्याच्या दृष्टीने कार्य सुरू केले आहे.
बातम्या आणखी आहेत...