आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इंडियाचा गैरवापर नाही, फेसबुककडून तातडीने दिले स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयात येण्यापूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गने डिजिटल इंडिया मोहिमेला पाठिंबा म्हणून आपला प्रोफाइल फोटो तिरंगी केला. त्यानंतर एक टूलही जारी केले. लगोलग नेटकऱ्यांनीही आपले फोटो बदलले. मात्र, असे करणे म्हणजे फेसबुकच्या इंटरनेट.ऑर्ग मोहिमेला पाठिंबा देणे आहे, असा प्रचार झाला. ही मोहीम नेट न्यूट्रॅलिटीविरुद्ध समजली जाते. त्यावर फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे. या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही, एका इंजिनिअरकडून चुकीने प्रोफाइल पिक्चरच्या कोडमध्ये इंटरनेट.ऑर्ग शब्दाचा वापर झाला. तो बदलला जात असल्याचे फेसबुकने सांगितले.
डिजिटल इंडियाच्या समर्थनार्थ प्रोफाइल पिक्चरखाली एचटीएमएल कोडमध्ये इंटरनेट.ऑर्ग हा शब्द दिसतो. त्यावरून डिजिटल इंडिया नव्हे तर इंटरनेट.ऑर्गला पाठिंबा मिळतो, असा गैरसमज पसरला.

इंटरनेट.ऑर्गद्वारे वंचितांना मोफत इंटरनेट देण्याची फेसबुकची महत्त्वाकांक्षी आहे. मात्र ते नेट न्यूट्रॅलिटीच्या म्हणजेच इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्या वा सरकारने सर्व लोकांना सर्व वेबसाइट व सेवा समानपणे उपलब्ध करण्याच्या सिद्धांताविरुद्ध आहे.