आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digvijay Singh Amrita Rai Case Police Orders Removal Of Photos From Social Sites

\'जरठरावां\'कडून राहुल गांधींना प्रेरणा मिळणार का? शिवसेनेने उडवली दिग्विजसिंहाची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - शिवसेनेने दिग्विजयसिंह आणि टीव्ही अँकर अमृता राय यांच्या प्रेमसंबंधावरुन काँग्रेस महासचिव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून दिग्विजयसिंह यांना राहुल गांधी यांचे 'लव्ह गुरु' होण्याचा सल्ला दिला आहे.
चला, 'प्रेमा'ला लागा! या शिर्षकाखाली 'सामना'तून दिग्विजयसिंह यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. दिग्विजयसिंह काँग्रेसचे वाचाळवीर होतेच आता ते प्रेमवीर म्हणून कीर्तिमान झाले असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल असे सांगत त्यात म्हटले आहे, 'कॉंग्रेसच्या पुढार्‍यांना सध्या फारसे काम उरलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तर बर्‍याचशा ज्येष्ठ कॉंग्रेसवाल्यांवर आता ‘करायचे काय?’ अशी आफत येणार आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठांनी स्वत:स प्रेमरोग जडवून घेतला असावा आणि त्या रोगात सुख मानून पुढचा काळ प्रेम आश्रमात व्यतीत करण्याचे त्यांनी ठरविलेले दिसते.'
काँग्रेसचे अनेक नेते प्रेमसंबंधामुळे चर्चेत राहत असल्याचे सांगत यातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काही प्रेरणा मिळेल का? असा जनतेला प्रश्न पडल्याचे लेखात म्हटले आहे. काँग्रेस नेते एन.डी.तिवारी नव्वीदी पार केल्यानंतरही 'बाप' होऊ शकतात. इंदिरा गांधींचे अत्यंत निकटचे मानले गेलेले आर. के. धवनही 75 व्या वर्षी साग्रसंगीत लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत. शशी थरूर यांनी प्रेमविवाह केलेल्या सुनंदा पुष्कर यांचा मध्यंतरी दुर्दैवी मृत्यू झाला, पण शशी थरूर यांची प्रेमप्रकरणे सतत चर्चेत असतात. 67 वर्षीय दिग्गिराजांनी प्रेमाची जाहीर कबूली दिली आहे. या सर्वांना 'जरठराव' संबोधत म्हटले आहे, 'कॉंग्रेसचे जरठकुमार एकामागून एक बाशिंग बांधत आहेत. वरातीच्या घोड्यासमोर स्वत:च नाचत आहेत, पण देशातील नामवंत ‘बॅचलर’, most eligible bachelor श्रीमान राहुल गांधी मात्र आजही प्रेमाच्या बगिचात चाचपडतच आहेत. तेव्हा दिग्विजय सिंग वगैरेंनी राहुल कुमारांची प्रेमाची शिकवणी घेऊन युवराजांचे ‘कल्याण’ करायला हरकत नाही.'

पुढील स्लाइडमध्ये वाचा, दिग्विजयसिंह-अमृता राय यांची सोशल साइट्सवरील छायाचित्रे हटवणार