आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digvijay Singh May Contest From Varanasi Seat News In Marathi

वाराणसीमध्ये मोदींना टक्कर देण्यासाठी दिग्विजयसिंह निवडणूक आखाड्यात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत वाराणसीच्या जागेवरून विविध पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता दिसून येत आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या मतदार संघातून अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढविण्याचे आव्हान स्वीकारल्यानंतर आता अशी बातमी समोर येत आहे, की काँग्रेस दिग्विजयसिंह यांना याच मतदारसंघातून तिकीट देण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजयसिंह यांनी वाराणसीमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून या संदर्भातील शेवटचा निर्णय शुक्रवारपर्यंत घेतला जाऊ शकतो.

वाराणसीमधून दिग्विजयसिंह यांना तिकीट मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण या जागेवर काँग्रेस एखाद्या दिग्गज व्यक्तीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसमध्ये दिग्विजयसिंह यांची प्रतिमा एक दिग्गज नेत्यासारखी आहे. दिग्विजयसिंह मध्य प्रदेशात दहा वर्ष मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. काँग्रेस हायकमांड वाराणसीच्या सीटसाठी उमेदवाराच्या नावाचा विचार करत असून यामध्ये दिग्विजयसिंह यांचे नाव सर्वांत पुढे आहे.