आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार नाही तेथे दंगली भडकावित आहे भाजप, दिग्विजयसिंहांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकिकडे पाकिस्तानी लष्कर भारतीय सीमेत घुसखोरी करून आपल्या जवानांना ठार मारत आहे, तसेच किश्तवाडमध्ये दोन समाजांमध्ये दंगली भडकल्या आहेत तर दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्यात मश्गुल असल्याचे दिसून येत आहे.

ज्या राज्यांमध्ये सरकार नाही तेथे दंगली भडकावून जनाधार मिळविण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करीत असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपने म्हटले आहे, की दिग्विजयसिंह यांच्याकडून आम्हाला कोणतेही प्रमाणपत्र नको.

दिग्विजयसिंह म्हणाले, की बिहारमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये सहावेळा दंगली उसळल्या. किश्तवाड आणि टोंक येथेही दंगली झाल्या आहेत. मी आधीच म्हटले होते, जनाधार मिळविण्यासाठी भाजप दंगली घडवून आणणार आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते म्हणाले, की दिग्विजयसिंह अगंभीर नेता आहेत. त्यांना गांभीर्याने घ्यायला नको. आमचा पक्ष सेक्युलर आहे. आमच्या पक्षाला दिग्विजयसिंह यांच्याकडून कोणतेही प्रमाणपत्र नको.

ओमर अब्दुल्ला काय म्हणाले जाणून घ्या, पुढील स्लाईडवर