आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्विजयसिंहांनी पाक समर्थक मसरतला म्हटले \'साहेब\', मोदींची तुलना हिटलरसोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनी आज (शुक्रवार) एका नव्या वादाला जन्म दिला आहे. दिग्विजयसिंह यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरसोबत केली तर, दुसरीकडे काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी नेता मसरत आलमचा उल्लेख 'साहेब' असा केला आहे. मसरत आलमने श्रीनगरमध्ये रॅली काढूत पाकिस्तानचा झंडा फडकावला होता. एवढेच नाही तर, त्याने मेरी जान पाकिस्तान अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर आज (शुक्रवार) त्याला अटक करण्यात आली आहे.
मसरतच्या अटकेवर बोलताना दिग्विजयसिंह यांनी त्याचा आदरार्थी उल्लेख केला. ते म्हणाले, 'मसरत आलम साहेबांना जम्मू-काश्मीर सरकारने कायद्याच्या कोणत्या कलमांखाली अटक केली आहे, ते देशाला सांगितले पाहिजे.' दिग्विजयसिंह यांचे म्हणणे आहे, की मसरत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्या घोषणा दिल्या आणि जे कृत्य केले ते देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखे आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजे. दिग्विजयसिंह यांनी याआधी कुख्यात दहशतवादी ओसामा बीन लादेनला ओसामाजी म्हटले होते.
मोदींची हिटलरसोबत तुलना
पंतप्रधान मोदी कॅनडा दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी काँग्रेसवर टीका केली, त्याचा समाचार दिग्विजयसिंह यांनी घेतला. एका इंग्रजी न्यूज चॅनेलसोबत बोलताना ते म्हणाले, 'ही विभाजनवादी मानसिकता आहे. त्यांना कळाले पाहिजे की 1947 पासून आजपर्यंत एकाही भारतीय पंतप्रधानाने देशाबाहेर अंतर्गत राजकारणाची चर्चा केलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आल्यानंतर रिपब्लिकन्स सोबत असलेल्या मतभेदांचा उल्लेख करतात का?' असा सवाल दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला.
जेव्हा दिग्विजयसिंह यांना ओबामांनी मोदींना भारताचा रिफॉर्मर इन चीफ संबोधल्याची आठवण करुन दिली तेव्हा ते म्हणाले, 'ब्रिटनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनी जेव्हा अॅडॉल्फ हिटलरची स्तुती केली होती, मात्र नंतर त्यांना त्यांचे शब्द परत घ्यावे लागले होते.'
दिग्विजयसिंह यांना जेव्हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन महिन्यांच्या सुटीबद्दल छेडले असता ते म्हणाले, गांधीनगरला जाऊन तेथील हॉटेलमधील वेटरला विचारा की तुमचे खासदार कुठे आहेत, ते काय उत्तर देतात ते ऐका. दिग्विजयसिंह यांनी मोदींना हिटलर म्हटल्यानंतर सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...