आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digvijay Singh\'s Daughter Karnika Singh Dies Of Cancer At Delhi Today Morning

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या 37 वर्षीय कन्येचे दिल्लीत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्विजय सिंग - Divya Marathi
दिग्विजय सिंग
नवी दिल्ली- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची कन्या कर्णिका कुमारी (वय 37) यांचे आज पहाटे दिल्लीत निधन झाले. कर्णिका कुमारी मागील काही महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होत्या.
कर्णिका यांच्यावर दिल्लीतील साकेत भागातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. कर्णिका वाचण्याची शक्यता फारच कमी होती याची जाणीव सिंग कुटुंबियांना होती. त्यामुळे कर्णिका यांच्यावर करण्यात येणारे अमेरिकेतील उपचार थांबवले होते. अखेर आज पहाटे त्यांचे निधन झाले. कर्णिका कुमारी यांचे 2005 साली वाधवानचे युवराज सिद्धार्थ सिंग (ज्युनिअर) यांच्याशी विवाह झाला होता.
दिग्विजय सिंग यांच्या पत्नी आशा सिंग यांचे 2013 साली कर्करोगानेच निधन झाले होते. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनी 2014 साली पत्रकार अमृता राय यांच्याशी विवाह केला होता.