काँग्रेसची जनमाणसात अशा प्रकारची भूमिका तयार झाल्याने काँग्रेसचे राजकीय पतन झाल्याचे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी अशा प्रकारचे मत व्यक्त केले आहे. काँग्रेस ज्याप्रमाणे हिंदु कट्टरवादाचा विरोध करते त्याचप्रमाणे मुस्लीम कट्टरवाद्यांवरही परखड मते मांडायला हवी. पण तसे होत नसल्याने 'भगव्या' पक्षांना संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचा राजकीय फायदा घेतला. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला.
दिग्विजय सिंह म्हणाले की, मुस्लीम कट्टरवाद्याच्या विरोधात जेवढे परखडपणे बोलण्याची गरज आहे, तेवढे परखडपणे आम्ही बोलत नाही. त्यामुळे कट्टरवादी हिंदु असो वा मुस्लीम
आपली भूमिका दोन्हींच्या संदर्भात एकसमान असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने वारंवार हिंदु कट्टरवाद्यांच्या विरोधात चिंता व्यक्त केली. आरएसएस आणि इतर संघटनांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या पूर्णपणे दूषित करून टाकली आहे. त्यामुळे नव्याने यावर विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.