आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूंवर भाजपने मुग गिळले का? दिग्विजयसिंह यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी शनिवारी मध्यरात्री स्वयंघोषीत संत आसाराम यांना अटक झाली आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मौन का धारण केले आहे, त्यांनी मुग गिळले का ? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे.

दिग्विजय सिंह यांनी रविवारी ट्विटरच्या माध्यमातून आसाराम यांच्यावरून भाजपवर निशाणा साधला. ते लिहितात, आसाराम यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होत आहे, असे असताना भाजप नेत्यांनी मौन का धारण केले आहे? स्त्रीयांवर होणा-या अत्याचाराविरोधात रणरागिणीचे रुप घेणा-या सुषमा स्वराज या प्रकरणी गप्प का आहेत? या मुद्यावर त्यांनी आपली भूमिका मांडायला पाहिजे, अशी अपेक्षा दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे.