आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींच्या मौनातच काँग्रेसच्या पराभवाचे मूळ, दिग्विजयिसंह यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मौन कारणीभूत असल्याचा आरोप दिग्विजयिसंह यांनी रविवारी केला. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी मौन बाळगल्याने पक्षाचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सिंह यांनी म्हटले आहे की, राहुल यांनी प्रचाराच्या काळात जास्तीत जास्त मुद्द्यांवर भाष्य करणे गरजेचे होते. लोकांना या विषयावर राहुल यांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घ्यावयाचे होते. युवकांना राहुलकडून खूप अपेक्षा होती. मात्र, दुर्दैव म्हणजे जे ४४ वर्षीय नेत्याला जमले नाही ते एका ६३ वर्षीय नेत्याने करून दाखवले आिण युवकांना आकर्षित केले. काँग्रेसने या देशासाठी आजवर काय केले, याचा बाजार आपल्याला मांडायचा नाही.

मात्र, त्यांनी (भाजपने) आमच्या अपयशांची जंत्री मांडली. आजचा काळ मीडिया आणि ब्रेकिंग न्यूजचा आहे. मोदी यांनी अत्यंत चलाखीने मीडियामध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आिण स्वत:ला राष्ट्रीय नेता म्हणून ओळख मिळवली. म्हणूनच राहुल यांनीही अधिकाधिक लोकांसमोर यावे, मीडियासमोर यावे आणि जास्तीत जास्त मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करावे, ही काळाची गरज असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.