आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilhi Govt Bought Onions At Rs 17 Kg And Sold To Delhiites At Rs 30 Kg: RTI Replies

\'आप\'चा दिल्‍लीत \'आम\' कांदा घोटाळा, विरोधकांनी दिली आरोपांची फोडणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात काद्यांचे भाव गगनाला भिडले. याचेच राजकारण करत आम आदमी पक्षाने (आप) आपल्‍या कार्यक्षेत्रातील दिल्‍लीकरांना 40 रुपये किलो दराचा कांदा 30 रुपये किलो दराने सबसीडीवर उपलब्‍ध करून दिला. त्‍यांच्‍या या 'फोडणी'मुळे विरोधकांना चांगलाच 'ठसका' बसला होता. मात्र, प्रत्‍यक्षात दिल्‍ली सरकारने हा कांदा 40 रुपये किलो नव्‍हे तर सरासरी 17 रुपये किलो दारानेच विकत घेतल्‍याचे धक्‍कादायक माहिती उघड झाली आहे. परिणामी, यात घोटाळा झाल्‍याचा आरोप होत असून, यामुळे 'आप' नेत्‍यांच्‍या डोळ्यांत पाणी आणण्‍याचे काम विरोधक करत आहेत.
नेमके काय उघड झाले माहिती अधिकारातून
माहिती अधिकारचे कार्यकर्ते विवेक गर्ग यांच्‍या माहितीनुसार, दिल्‍ली सरकारने 14 ते 20 रुपये किलो दराने नाशिक आणि इंदौरच्‍या बाजारपेठेतून 2500 टन कांदा विकत घेतला. मात्र, नागरिकांना सांगितले की, तो 32.86 पैसे रुपये किलो दाराने घेतला आहे. या शिवाय त्‍याचा आयात खर्च, स्‍थानिक कर मिळून त्‍याची किंमत सरासरी 40 रुपये किलो आहे, असे सरकारने सांगितले होते. या कांद्यांवर किलो मागे 10 रुपयांची सबसिडी देऊन तो 30 रुपये किलो दाराने सध्‍या विकला जात आहे. प्रत्‍यक्षात या कांद्यांची सरासरी खरेदी किंमत 17 रुपयेच आहे. उलट नागरिकांकडून सबसीडीच्‍या नावावर 13 रुपये जास्‍त उकळले जात आहेत, असा दावा गर्ग यांनी केला आहे.
काय म्‍हणते सरकार?
कांद्याच्‍या या व्‍यापारातून नफा मिळवणे दूरच आम्‍ही तो 10 रुपयांची सबसीडी देऊन विकत आहोत. म्‍हणजेच सरकाराला प्रति किलो मागे 10 रुपये भरावे लागणार आहेत. हा सर्व व्‍यवहार अत्‍यंत पारदर्शक असून, यात कुठलाच घोटाळा झाला नाही. कांद्यांची बाजारातील किंमत, तो आणण्‍यासाठी लागलेला प्रवास खर्च, स्टोरेज आणि 25 टक्‍के नुकसान असे मिळून त्‍याची किंमत सरासरी 40 रुपये किलो होते. पण, आम्‍ही तो 30 रुपये किलो दाराने विकत आहोत.
बीजेपीने केला आरोप?
दिल्ली बीजेपीचे अध्‍यक्ष सतीश उपाध्याय म्‍हणाले, केजरीवाल सरकारने कमी किंमतीमध्‍ये कांदा विकत घेऊन तो जास्‍त किंमतीमध्‍ये विकला. एवढेच नाही यात आम्‍ही सबसीडी देत असल्‍याची बतावणीही केली. हा मोठा घोटाळा आहे. त्‍यामुळे याची चौकशी करावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.