आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी 1992 पासून ब्रिटनचा रहिवासी- विजय मल्ल्या; अटकेसाठी ED इंटरपोलच्या संपर्कात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/लंडन- बँकांचे ९,४०० कोटी थकवून परदेशात पळ काढणाऱ्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांचा पासपोर्ट सरकारने रद्द केला आहे. दरम्यान, त्यांचे नाव ब्रिटनमधील मतदार यादीत आले आहे. त्यांचा पत्ता लंडनजवळील टेव्हिन गावातील लेडीवॉक या बंगल्याचा दाखवण्यात आला आहे.

पण हा बंगलाही त्यांनी करचोरी करून घेतल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मल्ल्यांनी बंगल्याची मालकी वैध असल्याचे सांगितले. आपण १९९२ पासून ब्रिटिश रहिवासी असल्याचे मल्ल्यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांनुसार या बंगल्याच्या मालकीशी निगडित एका कंपनीची नोंदणी ‘सेंट किट्स अँड नेव्हिस’ या टॅक्स हेवन देशात आहे.

विकास स्वरुप यांचे ट्वीट
- विकास स्वरुपयांनी ट्विट केले आहे की, माल्यांनी दिलेली उत्तरे आणि अंमलबजावणी संचलनालयाने केलेल्या विनंतीवरून जारी केलेली अजामीनपात्र वॉरंट पाहता परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचा पारपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ईडीने विजय माल्यांना तीन समन्स पाठवले आहेत. पण माल्या एकदाही हजर झाले नाही.
- हे समन्स 18 मार्च, 2 आणि 9 एप्रिलला पाठवले होते.

ईडीने केली होती मागणी
- ईडीने विजय माल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती.
- विजय माल्यांकडे बँकांची ९ हजार कोटींची थकबाकी आहे.
- माल्यांनी डिप्लोमॅटिक पारपोर्टच्या मदतीने 2 मार्चला देश सोडला होता. सध्या माल्या इंग्लंडमध्ये आहे, असे मानले जात होते.
- राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
बँकांना दिले होते नवे प्रपोजल
- विजय माल्यांनी गुरुवारी बँकासोबत तडजोड करण्यासाठी सुप्रीम कोर्टासमोर 6,868 कोटींची ऑफर ठेवली होती.
- त्यापूर्वी माल्यांनी 4,400 कोटींची ऑफर दिली होती.
- गुरुवारी माल्यांकडून 6,868 कोटी रुपये जमा करण्याची ऑफर देण्यात आली.
- पहिल्या ऑफरपेक्षा यात 2,468 कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत.