आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Directorate General Of Civil Aviation, Annual Report

दहा महिन्यांत वाढले १ कोटी विमान प्रवासी, DGCA चा अहवालात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या दहा महिन्यांत देशांतर्गत १ कोटी विमान प्रवासी वाढले आहेत. २०१४ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान ५.५६ कोटी लोकांनी विमान प्रवास केला होता. तर, या वर्षी दहा महिन्यांत ही संख्या ६.६६ कोटी झाली आहे. म्हणजे सुमारे २० % वाढ. मात्र, यादरम्यान विमानांत व विमानतळांवर या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. केवळ ऑक्टोबरमध्ये ४२ हजार ८३९ प्रवाशांना विमानात चढताना थांबवणे, अचानक उड्डाण रद्द होणे किंवा उशीर होणे अशा अडचणींशी सामना करावा लागला. म्हणजे सरासरी रोज १३८१ प्रवाशांची अडचण झाली. डायरोक्टरेट जनरल ऑफ सिव्हील अॅव्हिएशनच्या (डीजीसीए) वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली.
- १० महिन्यांत देशांतर्गत २०% प्रवासी वाढले, संख्या ६.६६ कोटी
- ४३ हजार प्रवाशांना एकट्या ऑक्टोबरमध्ये अडचणी आल्या
- २७ हजार प्रवाशांची एअर इंडियाने प्रवास करताना अडचण झाली
- वार्तांकन : सुधीरकुमारसिंह दीक्षित
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, विषयाशी संबंधित आकडेवारी ग्राफिक्‍समधुन..