आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चा, नाटक, कवितांनी गुलजार होणार जिफलिफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : गुडगाव येथे आयोजित होत असलेल्या द ग्रेट इंडियन फिल्म अँड लिटरेचर फेस्टिव्हल (जिफलिफ) च्या तिसऱ्या महोत्सवात प्रेक्षकांना नव्या विचारांची दिशा दाखवणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती यात सहभागी होतील. याशिवाय पुस्तक वाचन, नाटक, संगीत समारंभ, चित्रपटांचे स्क्रीनिंग, काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिफलिफचे सहसंस्थापक अमित सिन्हा, करण कुकरेजा यांनी सांगितले की चित्रपट क्षेत्रातील सुभाष घई, प्रकाश झा, पद्मविभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक अदूर गोपाळकृष्णन यांची सत्रे होणार आहेत. साहित्य क्षेत्रातील पद्मभूषण रस्किन बाँड, प्रसिद्ध लेखक किरण नागरकर, आनंद नीलकंठनदेखील यात सहभागी होतील. दिग्दर्शक सुधीर मिश्रा सिनेमाविषयीचे अनुभव सांगतील. कॉमिक्स, कवितांसारख्या माध्यमांसाठीदेखील मंच उपलब्ध करून दिला आहे. कविसंमेलनात सुरेंद्र शर्मा, बॉलीवूड अभिनेता व कवी पीयूष मिश्रा सहभागी होतील. एसबीआय कार्ड जिफलिफच्या पहिल्या दिवशी रजत कपूर दिग्दर्शित आणि विनय पाठक अभिनित नाटक ‘नथिंग लाइक लीर’चा प्रयोग सादर होईल. नऊ निवडक चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे, तर पोएट्री ऑन व्हील्स स्पर्धेतील विजेते तरुण कवी आपल्या कविता सादर करतील. पीयूष मिश्रा आपला ‘बँड बल्लिमारान’चा पहिला प्रयोग सादर करतील.
अधिक माहिती व पासेससाठी www.giflif.in या संकेतस्थळाला भेट द्या.
बातम्या आणखी आहेत...