आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून प्रति लिटर 50 पैशांनी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल पाठोपाठ आता डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. डिझेलच्या दरात या वर्षात सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलच्या प्रवक्त्याने सांगितले की, दिल्लीत आज मध्यरात्रीपासून 50.84 रुपये दरान डिझेल विक्री केली जाईल. सध्याचे डिझेलचे दर 50.56 रुपये आहेत. मुंबईत डिझेलच्या किंमतीमध्ये 62 पैशांनी वाढ होणार आहे. त्यामुळे आता 57.61 पैसे दराने डिझेल विक्री होणार आहे.


तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलच्या दरात 1 रुपया 82 पैशांची वाढ केली होती. डिझेल - पेट्रोल दरवाढीविरोधात कम्यूनिस्ट पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सीपीआय नेते डी. पंडीयन यांनी सांगितले की, जून महिन्यात तीन वेळा पेट्रोल दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ अन्यायकारक आहे. त्याविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येईल.