आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी संपत्ती असणाऱ्या 7 लोकसभा खासदारांची चौकशी, IT डिपार्टमेंटचे SC ला शपथपत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासदार-आमदार झाल्यानंतर संपत्तीत अचानक वाढ झालेल्यांची चौकशी होणार आहे. सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्डाने (सीबीडीटी) 7 लोकसभा खासदारांची चौकशी करणार असल्याचे सुप्रीम कोर्टात शपथपत्राद्वारे सांगितले आहे. दोन निवडणुकींच्या दरम्यान ज्या नेत्यांची संपत्ती 500 पटीने वाढली आहे त्यांच्यावर सरकारने काय कारवाई केली, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. 
 
98 आमदारांच्या संपत्तीत कित्येक पटीने वाढ
- सीबीडीटीने याआधी बुधवारी कोर्टात शपथपत्र दाखल केले होते. मात्र कोर्टाने ते अर्धवट असल्याचे सांगत नाकारले होते. 
- सीबीडीटीने सोमवारी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार लोकसभेतील 26 आणि राज्यसभेतील 11 खासदार व 257 आमदारांकडे उत्पन्नस्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने अशा खासदारांची चौकशी सुरु केली असून त्यांना 26 पैकी 7 खासदारांकडेच बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
- बोर्डाने म्हटले आहे की या सातही खासदारांविरोधात तपास सुरु करण्यात आला आहे. त्यासोबत म्हटले आहे की 257 पैकी 98 आमदारांची संपत्तीही कित्येक पटींनी वाढली आहे. 
 
कोणी दाखल केली याचिका 
- एका एनजीओने लोकप्रतिनिधींच्या संपत्ती वाढीचे रहस्य काय आहे, याची विचारणा केली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाकडे निवडणूक अर्ज दाखल करताना उत्पन्नाचे साधन कोणते याचेही शपथपत्र जोडण्याची याचिकेत मागणी केली होती. कोर्टाने यासंबंधी निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली होती. 
बातम्या आणखी आहेत...