आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Disqulification Of Member Of Legislative Process

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोषी लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू, निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कलंकित आमदार व खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत बुधवारी सर्व राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत. 10 जुलै 2013 नंतर दोन वर्षांवर शिक्षा सुनावलेल्या आमदार-खासदारांना अपात्र ठरवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव के.एफ. विल्फ्रेड यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. निर्णय 10 जुलैपासूनच लागू झाल्याची माहिती त्यात आहे.

निर्देश असे : 0 सर्व राज्यांनी दर महिन्याच्या 15 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करावा. 0 आमदार-खासदाराच्या सुनावणीची माहिती हवी. 0 राज्यांच्या अधिकार्‍यांनी सरकारच्या सहकार्याने यंत्रणा राबवावी. 0 आमदार-खासदारविरुद्ध निर्णय सुनावला जाताच विधिमंडळ अध्यक्षांना सूचना द्यावी.