आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disrupting Parliament Session Suits Congress: Alternative Is Possible Loss Or Isolation

तोडगा निघेना: आक्रमक विरोधकांमुळे संसद दुसऱ्या दिवशी ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ललित मोदी प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन गोंधळ घातल्याने संसदेच्या अधिवेशनाचे कामकाज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही तहकूब करावे लागले.

लोकसभेमध्ये कामकाज सुरू होताच काळ्या फिती लावलेल्या काँग्रेसच्या सदस्यांसह इतरही विरोधकांनी या विषयावर तातडीने चर्चा करावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तसेच इतर विरोधी नेत्यांनीही नोटीस देऊन चर्चा करण्याची मागणी केली होती. पण लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या नोटिसा फेटाळून लावल्या आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे संतप्त विरोधकांनी जोरदार घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. त्यानंतरही असेच प्रकार घडल्याने लोकसभा कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभाही तहकूब
राज्यसभेतही याच विषयावरून विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेच्या कामकाज नियमावलीनुसार राज्यांच्या विषयांवर संसदेत चर्चा करता येत नाही, असा युक्तिवाद अर्थमंत्री तथा राज्यसभेचे नेते अरुण जेटली यांनी केला. मात्र, व्यापमं घोटाळ्यात मध्य प्रदेशबाहेरही अनेक जणांचा गूढ मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो राज्याचा विषय होत नाही, असा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी मांडला. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरूच राहिली. त्यामुळे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी कामकाज दोन वेळा तहकूब केले. मात्र नंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने त्यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलेे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याचा दबाव : सुषमा